News18 Lokmat

गँगरेप प्रकरणात न्याय मिळत नसल्याची भावना; पीडितेची आत्महत्या

उत्तर प्रदेशमध्ये गँगरेप पीडितेनं आत्महत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 04:27 PM IST

गँगरेप प्रकरणात न्याय मिळत नसल्याची भावना; पीडितेची आत्महत्या

बदायू, 19 जून : उत्तर प्रदेशमध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. उत्तर प्रदेशातील बदायूमधील गँगरेप पीडित महिलेनं न्याय न मिळाल्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. पती आजारी असल्याचं कारण देत 3 जणांनी रोडवेज बस स्टँड जवळून महिलेला दिल्लीला घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांनी आळीपाळीनं आठवडाभर महिलेवर बलात्कार केला. पीडितेनं आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर सारी कर्मकहाणी आपल्या वडिलांनी सांगितली होती. त्यानंतर वडिलांनी दिल्लीला जात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी सतत पोलीस ठाण्याचं उंबरे झिजवले. पण, पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर देखील पीडितेनं आपल्या परिवारासोबत जात दातागंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण, न्याय मिळत नाही म्हणून पीडितेनं आत्महत्या केली. दरम्यान, दातागंज पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी एक टीम दिल्लीला रवाना केली आहे.


महिनाभर मुलीच्या मृतदेहासोबत राहिला निवृत्त पोलीस आणि पत्नी

15 मे रोजी घडली घटना

दातागंजची महिला बदायूला आली होती. यावेळी बस स्टॉपजवळ उभी असताना 3 जण पीडितेजवळ आले. त्यामध्ये समीर नावाची ओळखीची व्यक्ती देखील होती. यावेळी पतीची प्रकृती ठिक नसल्याचं सांगत तिघे जण तिला दिल्लीला घेऊन गेले. यानंतर तिघांनी पीडितेवर आठवडाभर बलात्कार केला.

Loading...

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

आत्महत्येपूर्वी पीडितेनं चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये पीडितेनं माझं पतीवर खूप प्रेम आहे. माझ्यासोबत 3 लोकांनी बलात्कार केला. यानंतर मी दातागंज पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली. पण, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. या प्रकरणात बदायू पोलीस मला न्याय देतील अशी खात्री असल्याचं पीडितेनं म्हटलं आहे. गँगरेप करणाऱ्या समीर, जोएब आणि अरबाजला शिक्षा मिळाल्यानंतर माझ्या आत्म्याला शांती मिळेल असं पीडितेनं आपल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.


VIDEO: थकित FRPसाठी बच्चू कडू यांचं शोले स्टाईलनं आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...