खून का बदला खून से; 29 वर्षानंतर वडिलांच्या हत्येचा घेतला बदला

तब्बल 29 वर्षानंतर तरूणानं आपल्या वडिलांच्या खूनाचा बदला घेतला.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 06:02 PM IST

खून का बदला खून से; 29 वर्षानंतर वडिलांच्या हत्येचा घेतला बदला

लखनऊ, 02 जुलै : 'खून का बदला खून से’ असे डायलॉग चित्रपटांमध्ये पाहायाला मिळतात. पण, लखनऊमध्ये एखाद्या चित्रपटाला शोभावं असं कथानक समोर आलं आहे. कारण, 1990मध्ये वडिलांची हत्या करणाऱ्या व्यक्तीची एका 29 वर्षीय तरूणानं खून केला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं सांगितलेली गोष्ट एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच आहे. कल्याण सिंह रावत असं या तरूणाचं नाव आहे. ज्यावेळी कल्याणच्या वडिलांचा खून सुंदर लालनं केला तेव्हा कल्याण केवळ एक महिन्याचा होता. परिणामी वडिलांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आपण खून केल्याची कबुली दिली आहे. सुदंरलाल रावत ( 68 वर्षे ) असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. महुराकला गावात ही घटना घटना घडली आहे. दरम्यान, सोमवारी पोलिसांनी कल्याण सिंह रावत याला बेड्या ठोकत तुरूंगात टाकलं आहे.

राहुल गांधींचा राजीनामा या कारणास्तव स्वीकारला जात नाही!

काय आहे प्रकरण?

1990मध्ये कल्याणच्या वडिलांची सुदंरलाल रावत यानं हत्या केली. त्यावेळी कल्याणचं वय एक महिना होतं. वयात आल्यानंतर कल्याणला आईकडून सुदंरलाल रावतनं वडिलांचा खून केला असल्याचं कळलं. तेव्हा त्यानं बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्याकरता कल्याणनं सुंदरलाल रावत सोबत मैत्री केली. अखेर रविवारी कल्याण या 29 वर्षाच्या तरूणानं संधी साधत सुंदरलाल रावल ( 68 वर्षे ) याचा धारदार शस्त्रानं संध्याकाळी खून केला. चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे कल्याण सिंह रावतनं कट रचला होता.

सुंदरलाल रावत यांच्या मुलानं कल्याणनं वडिलांचा खून केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत सोमवारी कल्याण सिंह रावतला अटक केली. चौकशीअंती कल्याणनं आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली. सध्या कल्याण सिंह रावत हा तुरूंगामध्ये आहे.

Loading...

VIDEO: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...