बॉयफ्रेंड दुसरं लग्न करणार असल्याचं कळताच प्रेयसीने शिकवला असा धडा, की...

तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचं कळताच ती थेट त्याच्या घरी गेली आणि जाब विचारला.

तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचं कळताच ती थेट त्याच्या घरी गेली आणि जाब विचारला.

  • Share this:
    बरेली 05 नोव्हेंबर: उत्तर प्रदेशातल्या बरेली (Bareilly) मध्ये धोका देणाऱ्या बॉयफ्रेंडला त्याच्या प्रेयसीने चांगलाच धडा शिकवला. आपला बॉयफ्रेंड हा दुसरं लग्न करणार असल्याचं कळताच तरुणी थेट त्याच्या घरीच गेली आणि घराबाहेर आंदोलनाच बसत ठाणच मांडलं. त्या तरुणाचं 8 नोव्हेंबरला लग्न आहे. मात्र त्याच्या घरासमोरून मी हटणारच नाही असा निश्चयच तिने केल्याने तरुणाचं कुटुंब हादरून गेलं आहे. या तरुणाचं आणि तरुणीचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचं आमिष दाखवून चार वर्ष माझा वापर केल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे. मात्र लग्न करण्याच्या तो फक्त थापा देत होता असा आरोपही तिने केलाय. आपला मुलगा हरियाणात नोकरी करतो आणि  तो गेल्या महिनाभरापासून घरीच आला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचं कळताच ती थेट त्याच्या घरी गेली आणि जाब विचारला. मुलाच्या कुटुंबीयांनी तिला घराच्या बाहेर काढले, मात्र ती थेट आंदोलनालाच बसली. तरुणीच्या आक्रमक भूमिकेमुळे सगळ्यांनाच काय झालं ते कळालं आहे. आता लग्न होणार असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनाही ही घटना कळाल्याने त्यांनीही फेरविचाराचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलनाला बसलेली तरुणी मागे हटायला तयार नसल्याने शेवटी पोलिसांनी तिची समजूत काढली मात्र ऐकायलाच तयार नसल्याने आता तोडगा कसा काढायला असा पेच सगळ्यांनाच पडला आहे. तर ही तरुणीच खोट बोलत असल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: