मराठी बातम्या /बातम्या /देश /

उत्तरप्रदेशात योगी सरकारने घेतला गोसंरक्षणासाठी हेल्प डेस्क सुरू करण्याचा निर्णय

उत्तरप्रदेशात योगी सरकारने घेतला गोसंरक्षणासाठी हेल्प डेस्क सुरू करण्याचा निर्णय

Cow paint

Cow paint

उत्तरप्रदेश सरकारने चारा बॅंक मॉडेल तयार केले असून, सध्याच्या कोरोना काळात 3452 चारा बॅंकांच्या माध्यमातून उत्तरप्रदेशमधील लाखो भटक्या गोवंशाला वेळेवर चारा उपलब्ध होत आहे.

लखनऊ, 6 मे: गोवंश विशेषतः भटक्या गायींच्या संरक्षणासाठी उत्तरप्रदेश सरकार विशेष उपाययोजना करीत आहे. यासाठी गोशाळा, गोठे उभारणीला प्राधान्य दिले जात आहे. तसेच कोरोना काळात भटक्या जनावरांना चारा टंचाई भासू नये याकरिता चारा बॅंकेसारखा (Fodder Bank) स्तुत्य उपक्रम देखील राबवला जात आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर गोवंशाच्या आरोग्यासाठी विशेष उपाययोजना करण्याबाबत गोशाळांना (Cow Shelters) सूचना देण्यात आल्या असून गोशाळा वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यातच आता सरकारने गोसंरक्षण अजेंडा (Agenda) तयार करण्यासाठी विशेष पुढाकार देखील घेतला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Government) योगी आदित्यनाथ सरकारने गोसंरक्षण अजेंडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गोसंरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत कक्ष उभारण्यात येणार असून, त्याकरिता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनांचे गोशाळांनी काटकोर पालन करावे, तसेच मास्कचा वापर आणि थर्मल स्कॅनिंग (Thermal Scanning) बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गायी तसेच अन्य जनावरांसाठी गोशाळांमध्ये थर्मल स्कॅनर आणि ऑक्सिमीटर सारखी वैद्यकिय उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोशाळांमध्ये मोठ्या संख्येने निराधार गायींना (destitute cow) आश्रय दिला जातो. भटक्या गायींच्या संरक्षणासाठी सरकारने गोशाळांची संख्या वेगाने वाढवली आहे.

वाचा: लव्ह, सेक्स, धोखा..! Facebook वर जमलं प्रेम आणि Whatsapp वरून दिला तीन तलाक

तसेच उत्तरप्रदेश सरकारने चारा बॅंक मॉडेल तयार केले असून, सध्याच्या कोरोना काळात 3452 चारा बॅंकांच्या माध्यमातून उत्तरप्रदेशमधील लाखो भटक्या गोवंशाला वेळेवर चारा उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री बेसहारा गोवंश सहभागिता योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला गोवंश सांभाळण्यासाठी अर्थिक मदत म्हणून उत्तर प्रदेश सरकारने 900 रुपये प्रतिमाह देण्याचे नियोजन केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत 44,651 लाभार्थ्यांना 85,869 गायींचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 1,05,380 गोवंशाच्या आरोग्यविषयक सुविधांकरिता 533 गोठ्यांची आणि 377 कार्यक्षम गोशाळांची नोंदणी करण्यात आली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात सध्या 5286 गोसंरक्षण केंद्रे आतापर्यंत सुरु करण्यात आली आहेत. यामुळे 5,73,417 गोवंशाला फायदा झाला. गावे आणि शहरातील 4,64,311 गोवंश सध्या 4529 तात्पुरत्या गोशाळांमध्ये दाखल आहे. त्यापैकी 40,640 गोवंश 161 कान्हा गोशाळांमध्ये तर 10,827 गोवंश 407 कांजी हाऊसेसमध्ये दाखल आहे. याव्यतरिक्त 171 मोठी गोसंवर्धन केंद्रे/गोअभयारण्ये (Cow Conservation Centers/Cow Sanctuaries) राज्यात उभारण्यात आली आहेत. यामाध्यमातून तब्बल 57,639 गोवंशाला आश्रय देण्यात आला आहे.

First published:

Tags: Uttar pradesh, Yogi Aadityanath