स्मशानभूमीत रात्रंदिवस काम करून या 2 महिला भरतात मुलांचं पोट

स्मशानभूमीत रात्रंदिवस काम करून या 2 महिला भरतात मुलांचं पोट

सात वर्षापूर्वी पतीच्या निधनानंतर घराच आर्थिक चणचण सुरू झाली त्यामुळे या महिलेला हे काम स्वीकारावं लागलं.

  • Share this:

जैनपूर, 28 सप्टेंबर : आपल्या मुलांसाठी आई अगदी स्वत:च्या जीवाचं रान करण्यासाठी तत्पर असते. कोरोना काळात या माऊलीवर जी वेळ आली आहे ती कुणावरही येऊ नये. ही माऊली आपल्या मुलाला दोन वेळचं जेवण मिऴावं म्हणून स्मशानभूमीत काम करते. महिलांना स्मशानभूमीत सहसा जाऊ दिलं जात नाही. अशा स्थितीतही असलेल्या परिस्थितीचा सामना करत या दोन महिला आपलं घर चालवण्यासाठी स्मशानभूमीत काम करत आहेत.

गेल्या 7 वर्षांपासून या महिला स्मशानभूमीत काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या गंगा-गोमतीच्या काठी स्मशानभूमीत लोक अंतिम संस्कारासाठी येतात. इथे साधारण दरदिवळी 8-10 मृतदेहांना दहन केलं जातं. या सर्व मृतदेहांची शेवटपर्यंत जबाबदारी या दोन महिलांवर असते. त्यासोबत या महिलांना त्यांचे कुटुंब जगते. सुरुवातीच्या काळात स्मशानभूमीत महिलांच्या उपस्थितीचा पुरुष समाजाने तीव्र विरोध केला असला तरी स्त्रियांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.

हे वाचा-Work From Home साठी मोठी बातमी! Google Meet ने लावली मोफत VIDEO Call ला कात्री

सात वर्षापूर्वी पतीच्या निधनानंतर घराच आर्थिक चणचण सुरू झाली. मुलांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाल्यामुळे काय करावं हे सुचेना. या महिलेनं स्मशानभूमीत काम सुरू करावं म्हणून गेली. मात्र धर्माच्या नावे आणि स्मशानभूमीत महिलांना प्रवेश नाही असं सांगून या महिलेला काम सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

या महिलेनं मात्र आपल्याला लहान मुलगा असून त्याची उपासमारी होत असल्यानं काम सोडण्यास नकार दिला. या स्मशानभूमीमध्ये दोन्ही महिला केवळ आपल्या मुलांची उपासमारी होऊ नये म्हणून गेले सात वर्ष हे काम करत आहेत अशी माहिती तिथल्या महिलांनी स्वत: दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 28, 2020, 7:46 PM IST

ताज्या बातम्या