चुकीला माफी नाही! छेड काढली तर महिलांनी On the Spot दिली शिक्षा, पाहा LIVE VIDEO

चुकीला माफी नाही! छेड काढली तर महिलांनी On the Spot दिली शिक्षा, पाहा LIVE VIDEO

महिलेनं बाजारपेठेत केली धुलाई, चपलेनं बेदम मारहाण केल्याचा LIVE VIDEO

  • Share this:

जालौन, 04 नोव्हेंबर : दोन दिवसांपूर्वी काँग्रेस जिल्ह्याध्यक्षाला चपलेनं बेदम मारहाण केलेल्या बहिणींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. भररस्त्यात छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलेनं चप्पल काढून बेदम मारहाण केली आहे. या व्यक्तीनं रस्त्यात छेड काढल्याचा आरोप करत महिलेनं त्याला चपलांचा चांगला प्रसाद दिला. हा सगळा गोंधळ पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी जमली होती. नागरिकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील उरई पोलीस ठाणा क्षेत्रात घडली आहे. छेड काढल्याचा आरोप करत या महिलेनं व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. हा गदारोळ पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी देखील जमली होती. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-आंटी म्हणताच सटकली; भर बाजारातच महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; पाहा VIDEO

याआधी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील आणखीन एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांना दोन तरुणींनी स्टेशन रोडवर मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काँग्रेस जिल्ह्याध्यक्ष अनुज मिश्रा यांना दोन तरुणींनी कॉलर पकडून चपलांनी बेदम मारहाण केली होती.

यावर अनुज मिश्रा यांचं म्हणणं आहे की, त्यांचं बिल्डिंग मटेरिअलचे दुकान आहे. तरुणींच्या घरात या दुकानातून तब्बल दीड ते दोन लाखांचं सामान गेलं होतं. त्यांच्याकडून अनेकदा याचे पैसे मागण्यात येत होते. त्यानंतर तरुणींनी अनुज यांना मारहाण केली.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 4, 2020, 10:43 AM IST

ताज्या बातम्या