बांदा, 01 नोव्हेंबर : आपल्या प्रेमातला अडथळा दूर करण्यासाठी पत्नी आणि प्रियकरानं पतीचा काटा काढला आहे. अवैध संबंधांमुळे पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे. पत्नीने पतीच्या अंगावर अॅसिड टाकल ज्यामुळे पती गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं असून सध्या तिची कसून चौकशी सुरू आहे.
होरपळलेल्या तरुणाच्या भावानं सांगितलं की त्याच्या भाऊ मजूर म्हणून काम करायचा. दोन दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न तोकडे पडले. चित्रकूट पोलिसांनी त्याच्या बद्दल माहिती दिली आणि आमच्या देखील पायाखालची जमीनच सरकली.
हे वाचा-एकट्या महिलांचं आरोग्य धोक्यात; गंभीर आजार घालतायेत विळखा
उत्तर प्रदेशातील बांदा इथे तरुण आपल्या पत्नीसोबत राहात होता. मोलमजूरी करून पोट भरायचा. दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. पीडित तरुणाच्या भावानं पीडितेच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेचे अवैध संबंध असल्यानं तिने प्रियकराच्या मदतीनं पतीला जाळलं. भावाने दिलेल्या माहितीनुसार पत्नीने गुप्तांगातही अॅसिड टाकल. त्यानंतर बेदम मारहाण केली आणि हालहाल केले पीडित मृत झाल्याचं समजून दोघांनी त्याला जंगलात फेकून दिलं.
पत्नी आणि तिच्या प्रियकरानं मिळून पीडित पतीला रस्त्यातून हटवण्याचा डाव आखला होता. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पीडित तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या प्रकऱणी पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदा परिसरात घडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh