उत्तर प्रदेश, 16 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील गोंडा (Gonda) जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हायरल व्हिडिओत सीएचसीचे डॉक्टर आणि कर्मचारी दारू पिऊन डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ तीन वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र व्हिडिओत डान्स करणाऱ्यांविरोधात कारवाई बडगा उगारण्यात आला आहे.
त्याचवेळी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएम मार्कंडेय शाही यांच्या निर्देशानंतर सीएमओ राधेश्याम केशरी यांनी सीएचसी येथे वर्षानुवर्षे कार्यरत असलेले डॉ.विवेक मिश्रा यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांची सीएचसी बभनजोत येथे बदली करण्यात आली आहे. तसंच 3 सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत. सद्यस्थितीत दारु पिऊन डान्स करणाऱ्या इतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची प्रतीक्षा आहे.
प्रकरण मुजेहना सामुदायिक आरोग्य केंद्राचं आहे. जिथे डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या परिसराला बार बनवलं आणि या लोकांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर जोरदार डान्स केला. डॉक्टर विवेक मिश्रा यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी सरकारी जबाबदारी पार पाडण्याऐवजी मौजमजा करताना दिसले.आता डॉक्टर विवेक मिश्रा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये डॉक्टर विवेक मिश्रा आणि त्यांचे कर्मचारी दारूची बाटली घेऊन नाचत आहेत. त्याचवेळी सीएचसी मुऱ्हाणा येथील डॉक्टर, आरोग्य शिक्षणाधिकारी, नेत्रतपासक यांच्याशिवाय रुग्णालयातील कर्मचारी दारूच्या नशेत धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ही घटना 3 वर्षांपूर्वीची आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोग्य विभागानं कारवाई केली आहे.
हेही वाचा- पोलिसांच्या क्रूरतेचा VIDEO..!आंदोलनकर्त्या महिलांच्या तोंडात कोंबला कपडा
प्रकरण समोर आल्यानंतर, गोंडाचे जिल्हादंडाधिकारी मार्कंडेय शाही यांच्या सूचनेवरून सीएमओ राधेश्याम केशरी यांनी डॉक्टर विवेक मिश्रा यांच्यावर कारवाई करत सीएचसी बभनजोत बदली केली आहे. 3 सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत.सद्यस्थितीत मद्यप्राशन करणाऱ्या इतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.