मराठी बातम्या /बातम्या /देश /

ATS ने मोठा घातपाताचा कट उधळला, पाकिस्तानी ISI एजेंटच्या मुसक्या आवळल्या

ATS ने मोठा घातपाताचा कट उधळला, पाकिस्तानी ISI एजेंटच्या मुसक्या आवळल्या

वाराणसीच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपाताचा कट उधळला आहे.

वाराणसीच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपाताचा कट उधळला आहे.

वाराणसीच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपाताचा कट उधळला आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
वाराणसी,20 जानेवारी: वाराणसीच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपाताचा कट उधळला आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI)एजेंटच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद राशिद असं त्याचं नाव आहे. चंदौली येथील पडाव परिसरातून राशिदला अटक करण्यात आली. मोहम्मद राशिद हा चंदौलीच्या मुगलसराय पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चौरहट येथील रहिवासी आहे. तो 2018 मध्ये पाकिस्तानातील कराची येथे मावशीकडे गेला होता. या दरम्यान तो आयएसआयच्या संपर्कात आला. सन 2019 पासून तो आयएसआयसाठी काम करत होता. देशातील महत्त्वाच्या ठिकाणांसह लष्कराच्या तळांची छायाचित्रे तो आयएसआयला पाठवत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राशिदचा लखनऊ येथे कसून चौकशी केली जात आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राशिद हा पाकिस्तानी लष्कराच्या इशाऱ्यावर काम करत होता. जोधपूरमधील भारतीय लष्काराच्या हलचालींची माहिती तो आयएसआयला कळवत होता. वाराणसी कँट, सीआरपीएफ अमेठीचा माहितीही त्याने आयएसआयला दिली आहे. तो व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आयएसआयला पाठवत होता. राशिद सध्या वाराणसीत पोस्टर आणि बॅनर लावण्याचं काम करत होता. पाकिस्तानी हॅंडलरच्या सांगण्यावरून राशिदला दोन भारतीय सिम कार्ड अॅक्टिवेट ओटीपी देण्यात आले होते. भारतीय सिम कार्डपर व्हॉट्सअॅप एक्टिव्ह करुन पाकिस्तानी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आपला अजेंडा राबवत होती. राशिदकडून पेटीएमच्या माध्यमातून आलेले 5 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्लीत प्रजासत्ताक दिनी घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला आहे. यासंबंधात एका दहशतवाद्याला मथुरेत अटक करण्यात आली आहे. तर दोन दहशतवादी फरार झाले आहेत. जीआरपीने सुरक्षा यंत्रणांना या दहशतवादी कटाची माहिती दिली होती.त्यनुसार या सगळ्या घडामोडींवर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून होत्या. एक काश्मिरी दहशतवादी दिल्ली- भोपाल शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असल्याची माहिती या यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार ही ट्रेन मथुरेत असताना या दहशतवाद्यास अटक करण्यात आली. पोलिसांना पाहताच या दहशतवाद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण अखेर त्याला यंत्रणांनी ताब्यात घेतलं. या दहशतवाद्याची आठ तास कसून चौकशी करण्यात आली. या दरम्यान त्याने स्वत:ला इजाही करून घेतली. आठ तासांच्या चौकशीनंतर त्याने या कटाची कबुली दिली. तसंच त्याचे दोन साथी दिल्लीत लपलेअसल्याचंही त्याने सांगितलं. त्यानंतर जामा मशीद भागातही पोलिस अधिकाऱ्यांनी छापे मारले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षासुद्धा वाढवण्यात आली आहे. सुत्रांनुसार दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात घातपात करण्याचा कट या दहशतवाद्यांचा होता.
First published:

Tags: #IndiavsPakistan, 26/11 terrorist attack, ATS, Varanasi

पुढील बातम्या