News18 Lokmat

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदाराला सात दिवसांची सीबीआय कोठडी

कोर्टाने 21 एप्रिलला कुलदीप सेंगरला कोर्टात पुन्हा हजर करण्याचे निर्देश दिले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2018 11:35 PM IST

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदाराला सात दिवसांची सीबीआय कोठडी

उत्तरप्रदेश, 14 एप्रिल : उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा आमदार कुलदीप सिंह सेंगरला कोर्टाने सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावलीये.

उन्नाव येथे  मागील वर्षी जून महिन्यात एका महिलेवर  बलात्कार करण्यात आला होता. हा बलात्कार भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेनगर केल्याचा आरोप पीडितेने केला. या प्रकरणी पोलिसांकडे सर्व पुरावे होते. मात्र, अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. अखेर  सगळे पुरावे असताना अजूनही कुलदीप सिंह सेनगरला अटक का झाली नाही आता चौकशी पुरे झाली तातडीने अटक करा असे आदेश अलाहाबाद हायकोर्टाने दिल्यानंतर सेंगरला अटक करण्यात आली होती.

आज सेंगरला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने कुलदीप सेंगरला सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. कोर्टाने 21 एप्रिलला कुलदीप सेंगरला कोर्टात पुन्हा हजर करण्याचे निर्देश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 11:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...