मराठी बातम्या /बातम्या /देश /

''पोलिसांसारखं प्रामाणिक कोणी नाही,पैसेही घेतात आणि कामही करतात'', अधिकाऱ्याचा Video Viral

''पोलिसांसारखं प्रामाणिक कोणी नाही,पैसेही घेतात आणि कामही करतात'', अधिकाऱ्याचा Video Viral

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये (Unnao)तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाचे एक आगळंवेगळं विधान समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये (Unnao)तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाचे एक आगळंवेगळं विधान समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये (Unnao)तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाचे एक आगळंवेगळं विधान समोर आलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

उत्तर प्रदेश, 20 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao)तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाचे (sub-inspector) एक आगळंवेगळं विधान समोर आलं आहे. हे विधानाचा व्हिडिओ सोशल (social media) मीडियावर व्हायरल झाला आहे. जिथे बिघापूर कोतवालीमध्ये तैनात असलेले उपनिरीक्षक उमेश त्रिपाठी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘अगर पुलिस ने आपसे पैसे ले लिए और कह दिया कि काम करेंगे तो करेंगे और कोई भी विभाग चले जाओ, पैसा ले लेगा तो रुला देगा.’उपनिरीक्षकाचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा व्हिडिओ सुमारे 10 दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर उन्नावचे एसपी दिनेश त्रिपाठी म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीओ बिघापूरकडे सोपवण्यात आला आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

हेही वाचा-  भारताची चिंता वाढवणारी बातमी, पाकिस्ताननं सुरु केल्या नव्या कुरापती

या व्हायरल व्हिडीओमध्ये उपनिरीक्षकाचे उमेश त्रिपाठी म्हणाले, 'पोलिसांपेक्षा चांगला डिपार्टमेंट नाही, आजही कोणी सर्वात प्रामाणिक आहे, तर तो पोलीस आहे, जर पोलिसांनी तुमच्याकडून पैसे घेतले आणि सांगितलं की काम करणार म्हणजे करणार. नाहीतर तुम्ही इतर कुठल्याही विभागात जा, आणि बघा, पैसे घेतील आणि तुम्हाला रडवतील.’ असे वक्तव्य पोलीस उपनिरीक्षक उमेश त्रिपाठी यांनी पोलिसिंग स्कूलमध्ये केलं.

उपनिरीक्षक उमेश त्रिपाठी यांनी बिघापूरच्या एका शाळेत 'पोलिसिंग की पाठशाला' कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्या केलं.

यावेळी ते पुढे म्हणाले की, 'तुम्ही बघा हे मास्तरसाहेब लोक आहेत, घरात राहतात, शिकवतात, 6 महिने सुट्टीत घालवतात, कोरोना आला तर. कुठेतरी. वर्षभर आम्ही येणार नाही आणि कोरोना आला तेव्हाही आम्ही ड्युटीवर होतो.’

हेही वाचा-  दारुड्या पित्यानं 13 महिन्याच्या मुलाला फेकलं नदीत, धक्कादायक कारण आलं समोर

उपनिरीक्षक उमेश त्रिपाठी हे विधान करत असताना मंचावर उपस्थित पोलीस अधिकारी हसत होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर उन्नावचे एसपी दिनेश त्रिपाठी म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीओ बिघापूरकडे सोपवण्यात आला असून चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

First published:

Tags: Uttar pradesh news, Viral video.