घरी येण्यास 10 मिनिटे उशिर झाल्याने दिला तलाक

उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी तलाकचा असाच एक अजब प्रकार उघडकीस आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2019 10:54 AM IST

घरी येण्यास 10 मिनिटे उशिर झाल्याने दिला तलाक

लखनऊ, 30 जानेवारी: तिहेरी तलाक विरोधातील विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर देखील तोडी तलाक देण्याच्या घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी तलाकचा असाच एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी घरी उशिरा आल्याने पतीने फोनवरून तलाक दिला आहे.

एटा येथील रहिवासी असलेल्या महिलेला घरी येण्यास केवळ 10 मिनिट उशिर झाला. यावर संतप्त झालेल्या संबंधित महिलेल्या पतीने फोनवरूनच तलाक दिला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित महिला माहेरी गेली होती. घरातून निघताना महिलेने 30 मिनिटात परत येतो, असे सांगितले होते. पण तिला येण्यास उशिर झाला. त्यावर पतीने महिलेला फोनवरून तीन वेळा तलाक-तलाक-तलाक असे म्हटले.

पीडित महिलेने सासरच्या लोकांकडून मारहाण केली जात असल्याचा आरोप केला आहे. लग्नाच्यावेळी मागण्यात आलेल्या हुंडा दिला नसल्याने मारहाण केली जात असल्याचा महिलेने म्हटले आहे. अशा प्रकारच्या मारहाणीमुळे एकदा गर्भपात करावा लागल्याचे तिने सांगितले. दरम्यान, पीडित महिलेने सरकारकडून मदत मागितली आहे.

लोकसभेत 27 डिसेंबर रोजी तिहेरी तलाक विरोधातील विधेयक मंजूर करण्यात आहे. यानुसार तोंडी तलाक देणाऱ्यास ३ वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


Loading...

VIDEO : आपल्यापेक्षा 36 वर्ष लहान असलेल्या 'या' अभिनेत्याला रेखाने मारली मिठी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 10:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...