• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • दुकानातच ट्रिपल मर्डर, रस्सीनं बांधलेल्या अवस्थेत आढळला माता-पित्यासह मुलाचा मृतदेह

दुकानातच ट्रिपल मर्डर, रस्सीनं बांधलेल्या अवस्थेत आढळला माता-पित्यासह मुलाचा मृतदेह

एका दुकानात तीन जणांची हत्या (Murder) करण्यात आली आहे.

 • Share this:
  कानपूर, 02 ऑक्टोबर: एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येनं उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) हादरलं आहे. एका दुकानात तीन जणांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. कानपूरमधील फजलगंजच्या शनिवारी सकाळी बस डेपोजवळ असलेल्या दुकानात ही घटना घडली आहे. तिघांचेही मृतदेह दोरीने बांधलेले आढळून आले. यात एक तरुण, महिला आणि मुलाचा मृतदेह आहे. मृतांमध्ये प्रेम कुमार, त्यांची पत्नी गीता देवी आणि लहान मुलगा नैतिक अशी ओळख पटली आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांकडून घटनेबाबत सुगावा मिळवण्यासाठी चौकशी केली जात आहे. एकाच वेळी झालेल्या तीन हत्यांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा आढावा घेत आहेत. हेही वाचा- 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं खोल समुद्रात फेकला भाला! Video शेअर करत म्हणाला...  याआधी शुक्रवारी, कानपूरमध्ये सरेशाम समाजवादी युवक सभेचे जिल्हा उपाध्यक्ष हर्ष यादव यांची गोळ्या घालून हत्या केली. या गोळीबारामुळे भाजी मार्केटमध्ये दहशत पसरली. दरम्यान समाजवादी पक्षाचा झेंडा असलेल्या कारमधून आरोपी पळून गेले. या घटनेतील आरोपी शिवेंद्रला पोलिसांनी अटक केली आहे. हेही वाचा- कोरोनाचा नायनाट करण्यासाठी तब्बल 20 औषधं Pipeline मध्ये, फक्त... आरोपी एसपीचा जिल्हा सचिव ग्रामीण असल्याचं सांगितलं जात आहे. कानपूर जिल्ह्यातील एकामागून एक गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या 24 तासात ही दुसरी मोठी हत्येची घटना आहे. तिहेरी हत्येच्या बातमीने आता पुन्हा एकदा कानपूर हादरुन गेलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: