पीलीभीत, 02 मे: वाघांसाठी आरक्षित असलेल्या वनक्षेत्रात माला रेंज इथे 3 ग्रामस्थांवर वाघानं हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दबा धरून बसलेल्या वाघानं जीपवरच थेट हल्ला केला. वाघाची झेप इतकी उंच होती की त्यानं थेट ट्रॅक्टरच्या बोनेटवर उडी घेऊन हल्ला केला. घटनास्थळी पोहोचलेले वनविभागाचे उच्च अधिकारी जंगलाच्या दिशेने वाघाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत होते. वाघानं हल्ला केल्यानंतर गोंधळ उडाला आणि आजूबाजूला असणाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानं वाघ झुडपात पुन्हा पसार झाला.
या वाघानं सकाळी शेतात जाणाऱ्या 3 शेतकऱ्यांवर केला केला होता. जखमी शेतकऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या वाघाला पुन्हा जंगलात पाठवण्याची मागणी स्थानिकांनी वन अधिकाऱ्यांकडे केली. या घटनेची माहिती जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांना कळताच तेही घटनास्थळी पोहोचले. तेथील वन अधिकारी व तेथील कर्मचार्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
हे वाचा-आपल्या पिल्ल्यांसोबत जात होता हत्ती समोरून आली दुचाकी पुढे काय झालं पाहा VIDEO
#WATCH A tiger attacks farmers, who were on a tractor, at a village in the Pilibhit district. Three people were injured in the attack. (01.05.20) pic.twitter.com/YaPgm0YfVC
— ANI UP (@ANINewsUP) May 1, 2020
एक महिन्यापूर्वी ह्या वाघानं अशाच प्रकारे धुमाकूळ घातला होता. वाघाच्या हल्ल्यामुळे दहशतीचं वातावरण होतं. त्याला वन अधिकाऱ्यांनी पकडून कानपूर प्राणीसंग्रहालयाकडे सुपूर्द केलं त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला होता मात्र आज सकाळी पुन्हा वाघानं हल्ला केला आणि ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली. वाघाच्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा-आईच ती! आजारी पिल्लाला तोंडात धरून मांजरीन पोहोचली रुग्णालयात, पाहा PHOTO
संपादन- क्रांती कानेटकर