VIDEO : मद्यधुंद शिपायानं अधिकाऱ्याला झोडपलं, 12 सेकंदात चपलेनं मारलं 6 वेळा
तरुणानं आधी दारू पिऊन मग चपलेनं बेदम मारहाण केल्याचा दावा उपस्थितांनी केला. मात्र त्यांच्यापैकी एकही जण या वादात मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावला नाही.
हमीनपूर, 24 फेब्रुवारी : तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याला शिपायाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 19 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये पहिल्या 12 सेकंदात तहसील अधिकाऱ्याला 6 वेळा चपलेनं बेदम मार खावा लागला आहे. यावेळा कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेत मोबाईलमध्ये संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला मात्र मध्ये कुणीही पडलं नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी मौन पाळलं आहे. मात्र या व्हिडिओमुळे तहसील कार्यालयापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तुफान चर्चा रंगली आहे.
ही घटना हमीनपुरा जिल्ह्यातील मौदहा तहसील कार्यालयातील असल्याची माहिती मिळत आहे. किरकोळ कारणावरून तहसील अधिकारी आणि या शिपायामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानं चिडलेल्या शिपायानं अधिकाऱ्याला चपलेनं बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. शिपायानं दारू पिऊन या अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचं तिथल्या उपस्थितांचं म्हणणं आहे. पहिल्या 12 सेकंदात तर तब्बल 6 वेळा त्याने बेदम चपलेनं मारहाण केली.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे ते. या व्हिडिओमध्ये तिथे उपस्थित असणाऱ्यांचेही आवाज येत आहेत. मात्र कुणीही हा प्रकार थांबवण्यासाठी मध्ये पडलं नाही. 'संतराम पिट गया' असं तिथलाच एक अधिकारी जोरजोरात ओरडताना दिसत आहे. संतराम मार खातोय पण त्याला मारू शकत नाही असं तहसील कार्यालयातील उपस्थित अधिकारी ओरडताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र कोणीही बोलण्यास तयार नाही उलट हा व्हिडिओ फॉरवर्ड करण्यात मशगुल झाले आहेत.