जनतेच्या पैशातून स्वत:च्या मूर्ती बांधणाऱ्या मायावती यांना कोर्टाचा झटका

जनतेच्या पैशातून स्वत:च्या मूर्ती बांधणाऱ्या मायावती यांना कोर्टाचा झटका

मायावती यांना जनतेच्या पैशांतून बांधलेल्या स्वत:च्या मूर्तींचा खर्च सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी: बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. मुख्यमंत्री असताना मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये अनेक मूर्ती बांधल्या होत्या. त्यापैकी काही मूर्ती या त्यांच्या स्वत:च्या होत्या. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने मायावती यांना जनतेच्या पैशांतून बांधलेल्या स्वत:च्या मूर्तींचा खर्च सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्ववाखाली झालेल्या सुनावणी दरम्यान या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त केली. मूर्ती, स्मारक आणि पार्क यांच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला खर्च जनतेच्या पैशातून करण्यात आला आहे. हा पैसा परत करावा लागेल. मायावतींनी मूर्तीवर केलेला खर्च सरकारी तिजोरीत जमा करावा. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी होणार आहे.

रविकांत आणि अन्य काही लोकांनी 2009मध्ये उत्तर प्रदेशमध्ये उभारण्यात आलेल्या मूर्ती आणि स्मारकांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका रद्द करण्यासाठी मायावती यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. गोगोई यांनी मायावतींच्या वकिलांना सांगितले की, हत्ती आणि मूर्तींवर करण्यात आलेला खर्च जनतेच्या पैशांतून केला आहे तो सरकारी तिजोरीत जमा करावा.

सत्तेत असताना मायावती यांनी संपूर्ण राज्यात बसपा संस्थापक काशीराम, हत्ती आणि स्वत:च्या मूर्ती बांधल्या होत्या. मूर्ती प्रकरणावरून याआधी देखील त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. प्रत्येक निवडणुकी विरोधी पक्ष या मुद्द्यावरन मायावतींवर टीका करतात. मायावती यांनी लखनऊ, नोएडा आणि अन्य शहरात पार्क आणि मूर्ती बांधल्या होत्या.

राज्यात अखिलेश यादव यांचे सरकाने यासंदर्भात दिलेल्या अहवालात पार्क आणि मूर्तींच्या निर्मितीसाठी 5 हजार 919 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तसचे याच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी 5 हजार 634 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

VIDEO : जनतेचा भाजपवर असलेला विश्वास काँग्रेसला खुपतोय - मोदी

First published: February 8, 2019, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading