Home /News /national /

Sudeekasha Bhati Death: छेडछाड नाही तर...सुदीक्षाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी नवा ट्वीस्ट

Sudeekasha Bhati Death: छेडछाड नाही तर...सुदीक्षाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी नवा ट्वीस्ट

पोलिसांना मिळाले काही पुरावे, सीसीटीव्हीच्या आधारे दोघांच्या मुस्क्या आवळल्या

    बुलंदशहर, 16 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील सुदीक्षा भाटी मृत्यू प्रकरणी आता नवीन ट्वीट समोर आला आहे. वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असून नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन तरुणांसह बाइक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर सुदीक्षाची छेडछाडीतून हत्या किंवा अपघात झाला नसून एका टँकरपासून वाचण्याच्या नादात झाला आहे. या संदर्भात पोलीस पत्रकार परिषदेत खुलासा करू शकतील अशीही माहिती मिळाली आहे. सुदीक्षाच्या मृत्यूचा गुंता सोडवण्याचं काम सध्या पोलीस वेगानं करत असून महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं आरोपींच्या गाडीपर्यंत पोहोचणं शक्य झालं. तर बुलेटसह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नेमकं काय आहे सुदीक्षा प्रकरण? सोमवारी आपल्या काकांसोबत नातेवाईकांकडे स्कूटरवरून जात असताना बुलेटवरून काही मुलं सुदीक्षाचा पाठलाग करत होती. रस्त्यात बुलेटसवार मुलांनी सुदीक्षाची छेड काढण्यास सुरुवात केली. आरोपी युवक सतत बाइक ओव्हरटेक करत होती. त्याच दरम्यान या मुलांपासून वाचवण्याच्या नादात सुदीक्षानं अचानक गाडीला ब्रेक लावला आणि गाडी घसरली. यात सुदीक्षाचा जागीच मृत्यू झाला होता. वडिलांनी काय केला आरोप? "पोलिसांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. पोलीस घटनास्थळी जाऊन आले, तरी त्यांनी गुन्हा का नाही दाखल केला? पोलीस याला अपघात म्हणत आहेत, पण माझ्या मुलीची हत्या झाली आहे" हे वाचा-भयंकर! 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी कापली जीभ आणि फोडले डोळे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक चौधरी बुलेवरून जात असताना सुदीक्षाच्या गाडीनं त्याच्या बाईकला धडक दिली होती. तर आरोपीने अपघातानंतर आपल्या बाइकचं रुप बदलल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 10 ऑगस्टला अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा अपघाती मृत्यू झाला. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Up Police, Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या