मराठी बातम्या /बातम्या /देश /

शाळेच्या टॉयलेटमध्ये गेले विद्यार्थी, जीव वाचवण्यासाठी सुरू झाली धडपड; नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत पाहा

शाळेच्या टॉयलेटमध्ये गेले विद्यार्थी, जीव वाचवण्यासाठी सुरू झाली धडपड; नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत पाहा

शाळेच्या टॉयलेटमध्ये विद्यार्थ्यांना दिसलं भयानक दृश्य. (प्रतीकात्मक फोटो)

शाळेच्या टॉयलेटमध्ये विद्यार्थ्यांना दिसलं भयानक दृश्य. (प्रतीकात्मक फोटो)

लघवीसाठी विद्यार्थी टॉयलेटमध्ये घुसल्यावर त्यांच्यासोबत असं काही घडलं की त्यांनी जीव मुठीत धरून तिथून पळ काढला.

    लखनऊ, 12 ऑगस्ट : दुपारचे बारा वाजले होते...  शाळेत गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना लघवीला झालं म्हणून ते टॉयलेटला गेलं. शाळेच्या टॉयलेटचा त्यांनी दरवाजा उघडला... पण लघवीसाठी टॉयलेटमध्ये गेलेल्या या विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. या विद्यार्थ्यांसोबत तिथं असं काही घडलं ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. उत्तर प्रदेशमधील एका शाळेमधील ही घटना. इटावामधील एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना टॉयलेटमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. त्यांना तिथं असं काही दिसलं की ते खूप घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला आणि ते जीव मुठीत धरून पळाले. जसे ते टॉयलेटमध्ये गेलं आणि दरवाजा उघडला, तसेच ते बाहेर आले आणि आल्या पावली मागे पळून गेले. धावत धावत ते मुख्याध्यापकांकडे गेले आणि त्यांनी जे काही पाहिलं त्याबाबत मुख्याध्यापकांना सांगितलं. मुख्याध्यापक तात्काळ टॉयलेटमध्ये गेले आणि त्यांनीही जे पाहिलं ते पाहून त्यांना धक्काच बसला. हे वाचा - समोर फणा काढून उभा राहिला खतरनाक कोब्रा, तरुणीने केलं किस; VIDEO पाहून अंगावर काटा येईल त्या टॉयलेटमध्ये दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क एक खतरनाक साप होता. विद्यार्थी टॉयलेटमध्ये घुसताच सापाने त्यांच्यावर हल्ला केला. विद्यार्थ्यांना सापाने चावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने विद्यार्थ्यांनी कसाबसा करून तिथून पळ काढला आणि सापापासून आपला जीव वाचवला होता. मुख्याध्यापकांनी टॉयलेटमध्ये सापाला पाहताच त्यांनी टॉयलेटचा दरवाजा बंद करून घेतला आणि तात्काळ सर्पमित्राला बोलावलं. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून मैदानात आणण्यात आलं. सर्पमित्र तात्काळ शाळेत आले आणि त्यांनी सापाला शोधायला सुरुवात केली. पण तोपर्यंत साप बाथरूममधील एका छिद्रातून बाहेर गेला आणि तिथल्या पार्कात घुसला. तिथं त्या सापाला पकडण्यात यश मिळालं. हे वाचा - एकमेकांवर तुटून पडले सिंह आणि क्रोबा; 2 किंगच्या फायटिंगमध्ये कोणी मारली बाजी पाहा VIDEO टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार या सापाला पकडणारे सर्पमित्र आशिष त्रिपाठी यांनी सांगितलं की ही  एस्पेक्टिकल कोबरा नागीण होती, जी खूप खतरनाक आहे. काळ्या नागाच्या तुलनेत ही नागीण लवकर हल्ला करते.  वॉर्निंग न देताच ती कुणालाही चावते. हीचं विष अर्ध्या तासातच माणसाचं जीव घेऊ शकतं.  जर ती चावली आणि वेळेत उपचार मिळाले नाही तर 30 मिनिटांतच व्यक्तीचा मृत्यू होतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Snake, Uttar pradesh

    पुढील बातम्या