मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मला गोळ्या घालू नका', गळ्यात पाटीनं घालून पोलीस स्टेशनमध्ये पोहचला कुख्यात गुंड आणि...

'मला गोळ्या घालू नका', गळ्यात पाटीनं घालून पोलीस स्टेशनमध्ये पोहचला कुख्यात गुंड आणि...

उत्तर प्रदेशातील संभाल जिल्ह्यातील एका पोलीस चौकीत चक्क एक कुख्यात गुंड पोहचला. विशेष म्हणजे त्यानं गळ्यात एक पाटी घातली होती.

उत्तर प्रदेशातील संभाल जिल्ह्यातील एका पोलीस चौकीत चक्क एक कुख्यात गुंड पोहचला. विशेष म्हणजे त्यानं गळ्यात एक पाटी घातली होती.

उत्तर प्रदेशातील संभाल जिल्ह्यातील एका पोलीस चौकीत चक्क एक कुख्यात गुंड पोहचला. विशेष म्हणजे त्यानं गळ्यात एक पाटी घातली होती.

    संभाल, 28 सप्टेंबर : कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत करावी लागतो. वर्षानुवर्ष त्या गुंडाची माहिती काढून, त्याचा शोध घ्यावा लागतो. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक भलताच प्रकार दिसून आला. उत्तर प्रदेशातील संभाल जिल्ह्यातील एका पोलीस चौकीत चक्क एक कुख्यात गुंड पोहचला. विशेष म्हणजे त्यानं गळ्यात एक पाटी घातली होती. या कुख्यात गुंडाने पाटीवर, "मला गोळी मारू नका, माझी लहान मुलं आहे. मी फळ विकून उदरनिर्वाह करत आहे. मी केलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा", असे लिहिले होते. या कुख्यात गुंडावर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गेल्या काही काळापासून तो फरार होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर 15 हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते. मात्र रविवारी गळ्यात पाटी घालून हा गुंड स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. यासंबंधी माहिती संभाल पोलिसांनी ट्वीट करत दिली आहे. यात त्यांनी 15 हजार रुपयांचे बक्षिस असलेल्या कुख्यात गुंडाने आत्मसमर्पण केल्याचे सांगितले. वाचा-VIDEO : कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन, ट्रॅक्टर पेटवून केला निषेध वाचा-कोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL या आरोपीचे नाव नइम असून रविवारी सकाळी हात जोडून तो पोलिसांसमोर उभा राहिला. त्याने पोलिसांना न मारण्याचे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी या बदमाश्याला गोळी न मारण्याचे आश्वासन दिले आणि त्याला अटक केली. वाचा-देशातील कोट्यवधी मुलं घेतात ड्रग्ज; यात तुमची मुलं तर नाहीत ना? अशी ओळखा लक्षणं पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक धरमपाल सिंग यांनी सांगितले की, हा आरोपी गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी अनेकदा छापे टाकले, मात्र त्याला पडकण्यात यश आले नाही. अखेर रविवारी आत्मसमर्पण करण्यासाठी तोच पोलीस स्टेशनमध्ये आला. नइमला अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या