मराठी बातम्या /बातम्या /देश /

भयानक..! मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतरही 27 रुग्णांच्या डोळ्यासमोर अंधारच, गेली 27 रुग्णांची दृष्टी

भयानक..! मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतरही 27 रुग्णांच्या डोळ्यासमोर अंधारच, गेली 27 रुग्णांची दृष्टी

सहारनपूरच्या एसबीडी जिल्हा रुग्णालयात, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या सुमारे 27 रुग्णांना त्यांची दृष्टी गमवावी लागली.

  • Published by:  Pooja Vichare

उत्तर प्रदेश, 29 डिसेंबर: मानवी डोळा हा देवाने दिलेला सर्वात मोठा वरदान आहे. डोळ्यांशिवाय जगणं खूप कठीण आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूर जिल्ह्यातील (Saharanpur district) सरकारी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सहारनपूरच्या एसबीडी जिल्हा रुग्णालयात, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या सुमारे 27 रुग्णांना त्यांची दृष्टी गमवावी लागली.

या सर्व रुग्णांच्या एका डोळ्याचं मोतीबिंदूचे ऑपरेशन या शासकीय रुग्णालयात करण्यात आलं होतं, मात्र 250 रुपयांची शासकीय लेन्स बसविण्यात आल्यानं त्यांची दृष्टी गेली असल्याचं सांगण्यात येत आहे. खेड्यापाड्यातून आणि परिसरातून आलेल्या रुग्णांवर 2 डिसेंबर 2021 रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि 27 लेन्स बसवून त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं.

हेही वाचा-  रंगीत स्वप्न दाखवून आयुष्य करायचे बेरंग; गरीब मुलींना परराज्यात नेऊन सुरू होता भयावह प्रकार

घरी गेल्यानंतर या रुग्णांच्या डोळ्यांना सूज आणि अजिबात दिसत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तपासण्यासाठी रुग्णालयात आणलं. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांनी त्यांना व्यवस्थित तपासलं नाही आणि त्यांना घरी परत पाठवले. त्यानंतर यातील काही रुग्ण वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले तर आठ रुग्णांना चंदीगड पीजीआयमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालय आणि सीएमओ कार्यालयासमोर गोंधळ घातला. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांची दृष्टी गेली, असा आरोप लोक करत आहेत. हिंदू संघटनेच्या लोकांनी मंगळवारी जिल्हा रुग्णालयात पोहोचून सीएमओ डॉ.संजीव मांगलिक यांना घेराव घालून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली.

First published:

Tags: Uttar pradesh news