मराठी बातम्या /बातम्या /देश /श्रीमंत खासदाराची मालमत्ता जप्त, SBI बँकेनं घेतली Action; 53 कोटींचं कर्ज Pending

श्रीमंत खासदाराची मालमत्ता जप्त, SBI बँकेनं घेतली Action; 53 कोटींचं कर्ज Pending

बसपाचे (BSP MP Malook Nagar) खासदार मलूक नागर आणि त्यांच्या भावाची मालमत्ता बँकेने ताब्यात घेतली आहे.

बसपाचे (BSP MP Malook Nagar) खासदार मलूक नागर आणि त्यांच्या भावाची मालमत्ता बँकेने ताब्यात घेतली आहे.

बसपाचे (BSP MP Malook Nagar) खासदार मलूक नागर आणि त्यांच्या भावाची मालमत्ता बँकेने ताब्यात घेतली आहे.

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बिजनौर लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha constituency) बसपाचे (BSP MP Malook Nagar) खासदार मलूक नागर आणि त्यांच्या भावाची मालमत्ता बँकेने ताब्यात घेतली आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं जाहिरातही जारी केली आहे. बँकेनं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे की, त्यांनी नगर डेअरी प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज दिलं होतं. ज्यामध्ये मलूक नगर आणि भाऊ राजवीर नगर हे जामीनदार होते.

12 जून 2017 रोजी बँकेनं त्यांना नोटीस बजावून 60 दिवसांत 53 कोटी 65 लाख 7 हजार 866 रुपये भरण्यास सांगितले होतं. मात्र त्यांनी ते भरले नाही. तेव्हापासून ही रक्कम सातत्यानं वाढत आहे. पैसे न भरल्यास, बँकेनं 9 डिसेंबर रोजी मेरठ आणि हापूर जिल्ह्यातील नगर डेअरी आणि मलूक नगर आणि त्याचा भाऊ राजवीर नगर यांच्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा दावा केला. बँकेनं यासंदर्भात नोटीस जारी केली असून या मालमत्तांबाबत कोणताही व्यवहार करू नये, असे म्हटले आहे.

बसपा खासदार मलूक नगर हे मोठे उद्योगपती आहेत आणि नोएडातील अनेक मोठ्या रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग आहे. मात्र, खासदार झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पांतून माघार घेतली आणि रिअल इस्टेट कंपन्यांमधील पदाचाही राजीनामा दिला. तसंच डेअरीच्या या प्रकरणी बँकेनं केलेली कारवाई चुकीची असल्याचं खासदारांनी म्हटलं आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सात वर्षांपासून आपण डेअरीचे काम करत नसल्याचं सांगितलं.

बँकेची कारवाई चुकीची : खासदार

बसपाचे खासदार मलूक नागर म्हणाले की, त्यांना या प्रकरणाची माहिती नाही आणि ते गेल्या वर्षभरापासून डेअरीच्या व्यवस्थापनातही नाहीत. हे प्रकरण माझ्या भावाशी संबंधित आहे. भावाने कर्ज घेतले होते, त्यात मी जामीनदार होतो. याबाबत मी बँक अधिकाऱ्यांशी बोललो नाही.

हेही वाचा- ''...तर युती तुटली नसती'', संजय राऊतांचं नवं विधान, नव्या राजकीय चर्चेला उधाण

या प्रकरणात, त्याचा भाऊ राजवीर 2018 मध्ये आणि नंतर 30 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेत सेटल झाला होता. यानंतर 25 टक्के रक्कमही जमा करण्यात आली असून त्यात सुमारे 16 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. बँकेने पुढील पैसे जमा करण्यासाठी वेळ दिला. ज्याची सर्व कागदपत्रे भावाकडे आहेत. त्यानंतरही बँकेने अशी कारवाई करणे चुकीचे आहे. याबाबत त्यांचे कायदेशीर मतही घेत असून याप्रकरणी कायदेशीर कारवाईही केली जाईल, असं खासदार यांनी म्हटलं आहे.

मलूक नागर यांची मालमत्ता

मेरठमधील मवाना रोडवरील रक्षापुरम निवासी योजनेचा भूखंड क्रमांक सी 43, 250 चौ.मी.

मेरठमधील मवाना रोडवरील रक्षापुरम निवासी योजनेचा भूखंड क्रमांक सी 44, 200 चौ.मी.

मेरठमधील मवाना रोडवरील रक्षापुरम निवासी योजनेचा भूखंड क्र. 45, 200 चौ.मी.

मेरठमधील मवाना रोडवरील रक्षापुरम निवासी योजनेचा भूखंड क्रमांक सी 46, 200 चौ.मी.

शकरपूर गावात खसरा क्रमांक 272 ची 0.2275 हेक्टर जमीन

शकरपूर गावात खसरा क्रमांक 272 ची 0.2275हेक्टर जमीन

शकरपूर गावात खसरा क्रमांक 273,274,275 ची 0.735 हेक्टर जमीन

नागर डेअरी प्रा.लि.ची मालमत्ता

शकरपूर गावात खाते क्रमांक 117, खसरा क्रमांक 280 मधील 0.3806 हेक्टर

शकरपूर गावात खाते क्रमांक 157, खसरा क्रमांक 282 ची 0.190 हेक्टर जमीन

शकरपूर गावातील खाते क्रमांक 175, खसरा क्रमांक 282 ची 0.7304 हेक्टर जमीन

शकरपूर गावातील खाते क्रमांक 158, खसरा क्रमांक 296 ची 0.4870 हेक्टर जमीन

शकरपूर गावातील खाते क्रमांक 124, खसरा क्रमांक 280 ची 0.4160 हेक्टर जमीन

शकरपूर गावातील खाते क्रमांक 142, खसरा क्रमांक 282 येथील 0.8102 हेक्टर जमीन

First published:
top videos

    Tags: Uttar pradesh news