Home /News /national /

3 गुंडांचा हैदोस! पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या युवकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, VIDEO VIRAL

3 गुंडांचा हैदोस! पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या युवकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, VIDEO VIRAL

भरदिवसा पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या 3 गुंडांनी बेदम मारहाण केली.

    रायबरेली, 01 ऑगस्ट : भरदिवसा पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या 3 गुंडांनी बेदम मारहाण केली. लाथा बुक्क्यांनी या तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात गुंडांनी धुडगूस घातल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरण दखल न दिल्यान अद्यापही हे तीन गुंड मोकाट फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हायरल व्हिडीओ मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांवरच कारवाई करण्यात आली. पोलिसांची भीती न बाळगता तीन गुंड सऱ्हाइतपणे शहरात हैदोस माजवत असल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पेट्रोल पंपावर एका तरुणाला बेदम मारहाण केली. हा तरुण पोलिसांकडे न्याय मागायला गेला तेव्हा योग्य न्याय मिळाला नाही. पोलिसांनी तीन गुंडांवर कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरस झाला. हे वाचा-मटका किंगचा मर्डर, ऑफिससमोरच गोळ्या झाडून केलं ठार उत्तर प्रदेशातील रायबरेली इथे रायबरेली या प्रकरणी पोलिसांना दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी एका पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. गुरुवारी दुपारी गल्ला मंडीजवळील त्याच्या पेट्रोल पंपावर दुचाकीचे इंधन भरण्यासाठी आले. त्याचवेळी याच परिसरातील चमेला भवनाजवळ राहणाऱ्या तीन जणांनी दुचाकीवरून पेट्रोल पंपाजवळ येऊन तिथे पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या तरुणाला बेदम मारहाण केली. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित तरुणानं तक्रार दाखल केली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या