Home /News /national /

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धुलाई, हॉस्टेलमध्ये घुसून पोलिसांकडून मारहाण; क्षणात Video Viral

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धुलाई, हॉस्टेलमध्ये घुसून पोलिसांकडून मारहाण; क्षणात Video Viral

प्रयागराजमध्ये (Prayagraj, UP) नोकरी न मिळाल्याने योगी सरकारच्या (Yogi Government) विरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत.

    उत्तर प्रदेश, 26 जानेवारी: यूपीच्या प्रयागराजमध्ये (Prayagraj, UP) नोकरी न मिळाल्याने योगी सरकारच्या (Yogi Government) विरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत. सलोरी भागातील प्रयाग स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवर उतरून विद्यार्थ्यांनी ट्रॅकवरच तळ ठोकला आणि बराच वेळ आंदोलन सुरूच ठेवलं. त्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीमार केला आणि पुढील कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल यासंदर्भातले काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात पोलीस हॉस्टेलमध्ये घुसून आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढत आहेत, ज्यांनी रस्त्यावर गोंधळ निर्माण केला. काही पोलीस बंदुकीच्या बटाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करताना दिसले, तर काही लाथा मारून दरवाजा तोडत होते. परिसरात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रियंका गांधी यांचं नाराजी ट्विट प्रियंका गांधी यांनीही ट्विट करून या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, प्रयागराजमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या लॉज आणि हॉस्टेलची तोडफोड करणे आणि त्यांना मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. प्रशासनाने ही जाचक कारवाई त्वरित थांबवावी. तरुणांना रोजगाराबाबत बोलण्याचा पूर्ण अधिकार असून या लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? हे आंदोलन NTPC च्या निकालाबाबत म्हणजेच RRB (रेल्वे भर्ती बोर्ड) मधील नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भर्ती संदर्भात केले जात आहे. मंडळाने शेवटच्या क्षणी नियमात बदल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांनाच सेवेत घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मते, प्रत्यक्षात हा आकडा 20 टक्के असायला हवा होता. आता ती मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर निदर्शने केली, ट्रॅकला घेराव घालण्यात आला आणि बराचवेळ गोंधळ घातला गेला. घटनास्थळी विद्यार्थ्यांची संख्या अधिक वाढल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाठवला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना घटनास्थळावरून हटवण्यात आले. पण हे आंदोलन तिथेच संपलं नाही. नंतर पोलिसांनी हॉस्टेलम्ये प्रवेश केला आणि त्या निदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या खोल्यांचे दरवाजे तोडण्यात आले. पोलिसांच्या कारवाईचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामुळे विरोधकांनी योगी सरकारला घेरले आहे. काय म्हणाले पोलीस ? प्रयागराजचे एसएसपी अजय कुमार यांनीही या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. अराजकता पसरवणार्‍यांची गय केली जाणार नाही आणि अनावश्यक बळाचा वापर करून दहशत पसरवणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांनाही सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी असेही सांगितले की, विद्यार्थी वारंवार दगडफेक करत होते आणि त्यानंतर ते जवळच्या हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये लपून बसले होते, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना खोलीतून बाहेर काढण्याचे काम केले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttar pradesh news

    पुढील बातम्या