तक्रारदार महिलेसमोर पोलिसानं केलं हस्तमैथुन, VIDEO मुळे समोर आला धक्कादायक प्रकारऔए

तक्रारदार महिलेसमोर पोलिसानं केलं हस्तमैथुन, VIDEO मुळे समोर आला धक्कादायक प्रकारऔए

जमिनीशी संबंधित वादात गुन्हा दाखल कऱण्यााठी ही महिला पोलिस ठाण्यात आली होती. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला.

  • Share this:

देवरिया, 01 जुलै : संपूर्ण पोलीस खात्याला लाजवेल असं कृत्य एक अधिकाऱ्यानं केलं आहे. त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेसमोर पोलीस अधिकाऱ्यानं हस्तमैथुन केल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला. दर दिवशी होणाऱ्या प्रकाराला वैतागून एक दिवस महिलेनं धाडस करून व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील घटना देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलिस ठाण्याची आहे. एक महिला तक्रार करण्यासाठी आली असताना पोलिस ठाण्याचे एसएचओ भीष्म पाल सिंह यांनी पँटची झिप उघडली आणि त्या हस्तमैथुन करण्यास सुरवात केली असा महिलेचा आरोप आहे. महिलेने या घटनेचा व्हिडीओ तयार केला आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात एफआयआऱ दाखल कऱण्यात आला असून चौकशी सुरू आहे. जमिनीशी संबंधित वादात गुन्हा दाखल कऱण्यााठी ही महिला पोलिस ठाण्यात आली होती. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार याआधीही अशाप्रकारे या पोलीस अधिकाऱ्यानं महिलांसोबत गैरवर्तन केलं होतं. या व्हायरल व्हिडीओनंतर उत्तर प्रदेश पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 1, 2020, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading