लखीमपुरा, 12 सप्टेंबर : अनेकदा आपण सिनेमामध्ये हरवलेली किंवा एखाद्या दुर्घटनेत गुगल मॅपचा वापर करून लोकेशन शोधून काढतानाचा सीन पाहातो. तसाच काहीसा प्रकार प्रत्यक्षातही पाहायला मिळाला. 10 वर्षांचा हरवलेला मुलगा शोधण्यासाठी पोलिसांनी गुगल मॅपची मदत घेतली आणि अवघ्या 24 तासांत या मुलाला शोधून काढलं.
उत्तर प्रदेशातील लखीमपुरा इथे 10 वर्षांचा मुलगा सायकल चालवायला म्हणून बाहेर पडला आणि घरी परतलाच नाही. बराच वेळ वाट पाहून झाल्यावर घरच्यांनी शोधाशोध सुरू केली आणि अखेर दाम्पत्य पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले. कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिली.
हे वाचा-या महिलेनं 3 मिनिटांत संपवले 10 डोनट्स, कोरोना काळात बनवला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
अशोक सिंह भदौरिया यांचा 10 वर्षांचा मुलगा सकाळी 9 वाजता नाश्ता करून सायकल चालवण्यासाठी बाहेर पडला. मात्र 1 तास उलटूनही पुन्हा घरी परतला नाही त्यांनी शोधाशोध केली मात्र मुलाचा कुठेच पत्ता लागत नाही म्हटल्यावर थेट पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष देऊन तपास सुरू केला.
गुगल मॅपच्या मदतीनं अवघ्या 24 तासात पोलिसांनी तपासाचा छडा लावला. एसपी लखीमपुर खीरी सत्येंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी 112 क्रमांकावर एक फोन आला होता, असे सांगून एक मुलगा सकाळी घरी घराबाहेर सायकल घेऊन आला होता, पण परत आला नाही. यानंतर आम्ही 4 पोलिस पथके तैनात केली. 5 किलोमीटर परिसरात गुगल मॅपच्या मदतीनं या मुलाचा तपास केला आणि आम्हाला 24 तासांत मुलगा गुगल मॅपच्या मदतीनं सापडला. आम्ही या मुलाला पालकांच्या स्वाधीन केल्याचंही त्यांनी सांगितलं.