Home /News /national /

नवरात्र उत्सवात तरुणांची गुंडगिरी, हवेत गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी काय केली शिक्षा पाहा VIDEO

नवरात्र उत्सवात तरुणांची गुंडगिरी, हवेत गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी काय केली शिक्षा पाहा VIDEO

काही तरुणांनी एकत्र येत हवेत गोळीबार केलेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

    जबलपूर, 21 ऑक्टोबर : देशभरात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असताना काही तरुणांनी गुंडगिरी दाखवत व्हिडीओ तयार केला. हवेत गोळीबार करण्याचा व्हिडीओ तरुणांनी सोशल मीडियावर तुफान व्हायरल केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परिसरात दहशतीचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी तात़डीनं हा व्हिडीओ पाहून कारवाईसाठी पावलं उचलली आणि या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नवरात्र उत्सवात गुंडगिरी करणाऱ्या तरुणांपैकी तिघांच्या मुस्क्या आवळल्या. या तिघांचे हात बांधून संपूर्ण गावातून धिंड काढली आणि त्यावेळी पोलिसांची ज्यादा कुमक तैनात करण्यात आली होती. अपराध करणं गुन्हा आहे असं म्हणण्याची शिक्षा देखील पोलिसांनी या तरुणांना दिली आणि संपूर्ण गावातून धिंड काढत या गुंडांना चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांच्या या कामगिरीची गावात खूप कौतुक होत आहे. हे वाचा-धक्कादायक! 40 फूट खोल दरीत कोसळली खासगी बस, 4 जणांचा मृत्यू तर 35 गंभीर जखमी काही तरुणांनी एकत्र येत हवेत गोळीबार केलेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीनं या तरुणांवर कारवाईसाठी शोध सुरू केला. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात यश आलं असून त्यांच्यासोबतचे आणखीन काही फरार साथीदारांचा तपास सुरू आहे. ही घटना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातील जबलपूर भागात घडली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या