• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • तीन रुग्णालयात मृत्यू झाला सांगून ठेवलं शवागारात, अन् 7 तासांनंतर सुरु झाला श्वासोच्छवास

तीन रुग्णालयात मृत्यू झाला सांगून ठेवलं शवागारात, अन् 7 तासांनंतर सुरु झाला श्वासोच्छवास

एक आश्चर्यकारक घटना घडल्याच पाहायला मिळालं आहे. येथे पोलिसांना रस्ता अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती.

 • Share this:
  उत्तर प्रदेश, 20 नोव्हेंबर: मुरादाबादमध्ये (Moradabad) एक आश्चर्यकारक घटना घडल्याच पाहायला मिळालं आहे. येथे पोलिसांना रस्ता अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाची मॉर्चुरी गाठली. त्याचवेळी पोलीस मृत व्यक्तीच्या अंगावरील जखमांच्या खुणा पाहत होते आणि तेव्हाच मृत व्यक्तीचा श्वासोच्छवास सुरू असल्याचं समजले. ही बाब कुटुंबीयांना समजताच कुटुंबात पसरलेली शोककळा आनंदात बदलली. त्यानंतर तातडीने डॉक्टरांनी येऊन त्या व्यक्तीची तपासणी केली आणि पुन्हा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तत्पूर्वी रुग्णालयातही मृत घोषित केल्यानंतर रात्री साडेचार वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या मॉर्चुरीत ठेवण्यात आला होता. 7 तासांनंतर श्वासोच्छवास सुरु शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातल्या मॉर्चुरीमध्ये त्यावेळी एकच गोंधळ उडाला. कारण मॉर्चुरीमध्ये ठेवलेल्या व्यक्तीचा 7 तासानंतर श्वासोच्छवास सुरु झाला. हेही वाचा- महिला आमदाराचा Boyfriend सोबतचा अश्लील Video viral करणारा अटकेत नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी श्रीकेश महापालिकेतील कर्मचारी आहे. रात्री उशिरा तो घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडला असता रस्त्याने जात असताना श्रीकेशचा अपघात झाला. ही माहिती नातेवाइकांना मिळताच एकापाठोपाठ एक तीन खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र श्रीकेशला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात आणला. जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन स्थितीत उपस्थित असलेले डॉक्टर मनोज यांनीही श्रीकेशला तपासून मृत घोषित करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मॉर्चुरीमध्ये पाठवला. मृत घोषित केले शुक्रवारी सकाळी पोलीस मृतदेहाचा पंचनामा करण्याच्या तयारीत होते, तेव्हाच हा मृत व्यक्ती श्वास घेत असल्याचे लक्षात आले. तेथे उपस्थित कुटुंबीयांनी श्रीकेशला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. नेमकं काय घडली घटना श्रीकेशच्या मेहुण्यानं सांगितलं की, 11 वाजता मला फोन आला की अपघात झाला आहे, म्हणून मी गाडी घेऊन आलो. येथे आल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल ब्राइट स्टारमध्ये सांगितले की, आमच्या येथे सुविधा नाहीत, साई हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आम्ही साई हॉस्पिटल घेऊन गेलो. अॅम्ब्युलन्स सोबत होती. साई हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे एक पथक आले पण त्यांच्याकडे व्हेंटिलेटर नव्हते. त्यावर डॉक्टर म्हणाले कॉसमॉसला घेऊन जा. आम्हाला वाटले विवेकानंदाला घेऊन जाऊ, विवेकानंदांना घेतले तर इमर्जन्सी डॉक्टर होते. त्यांनी चेकअप केलं. ट्रीटमेंट दिली नाही आणि मशिन लावल्यावर ना पल्स आहे ना बीपी, मग यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. हेही वाचा- महाराष्ट्रातल्या अल्पवयीन मुलीवर मध्य प्रदेशात बलात्कार, प्रकृती चिंताजनक रुग्णवाहिका सरकारी असल्यानं आम्ही जिल्हा रुग्णालयात आणली. इमर्जन्सीमध्ये डॉक्टर तिथे होते. आम्ही सर्व प्रकार डॉक्टरांना सांगितला, त्यानंतर त्यांनी मृतदेह मॉर्चुरीमध्ये ठेवा, असे सांगितले, त्यानंतर मृतदेह मॉर्चुरीमध्ये ठेवल्यानंतर आम्ही आलो. वेगवेगळ्या रुग्णालयात नेलं श्रीकेशला श्रीकेशच्या मेहुण्यानं पुढे सांगितले की, काल रात्री उशिरा माझ्या मेहुण्याचा अपघात झाला. ते मुरादाबाद येथील महापालिकेत कामला आहेत, त्यांची पत्नी एका खासगी रुग्णालयात काम करते. घटनेची माहिती मिळताच श्रीकेशच्या पत्नीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले, तेथे काही वेळाने डॉक्टरांनी श्रीकेशला मृत घोषित केलं. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या रुग्णालयातही नेण्यात आले. तेथेही श्रीकेशला मृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांना मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे होते, त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मॉर्चुरीत पाठवण्यात आला, मात्र सकाळी श्रीकेशचा श्वासोच्छवास सुरू असून तो जिवंत असल्याची माहिती मिळाली. हा निष्काळजीपणा आहे. हेही वाचा- 250 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेची सत्ता होती महिलेच्या हाती या संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा रुग्णालयातील सीएमएस डॉक्टर शिव सिंह यांच्याकडून घेतली असता त्यांनी सांगितले की, श्रीकेश नावाच्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टर मनोज यादव यांनी संपूर्ण तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा मॉर्चुरीत पाठवण्यात आला आणि पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.
  Published by:Pooja Vichare
  First published: