• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • योगी आदित्यनाथ यांनी शेअर पंतप्रधान मोदींसोबतचा Photo, कवितेतून मांडल्या भावना

योगी आदित्यनाथ यांनी शेअर पंतप्रधान मोदींसोबतचा Photo, कवितेतून मांडल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचीही भेट घेतली.

 • Share this:
  उत्तर प्रदेश, 21 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 56 व्या DGP IGP परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तीन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्याच दरम्यान सीएम योगी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा त्यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पीएम मोदी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसत आहेत. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान राजभवनाच्या कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री योगींच्या खांद्यावर हात ठेवून फिरताना आणि सखोल चर्चा करताना दिसत आहेत. आज सीएम योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत एका कवितेतून आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन-मन अर्पण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अम्बर से ऊंचा जाना है, एक भारत नया बनाना है.’ आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9.15 वाजता DGP मुख्यालयात पोहोचले. तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधान थेट नवव्या मजल्यावर आयोजित कॉन्फरन्स हॉलमध्ये पोहोचले. हेही वाचा- मोठी बातमी: वेस्ट इंडिजच्या खेळाडूला गंभीर दुखापत, स्ट्रेचरने नेलं मैदानाच्या बाहेर, LIVE VIDEO पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर विविध मुद्द्यांवर चर्चा आणि चर्चेचा फेरा एकामागून एक सुरू झाला. देशातील विविध राज्यांचे डीजीपी आणि आयजीपींच्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसह विविध मुद्द्यांवर दिवसभर विचारमंथन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी सर्व सत्रात भाग घेतला. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वारंवार भेटी होत आहेत. या अंतर्गत, यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राणी लक्ष्मीबाईच्या जयंतीनिमित्त झाशीमध्ये विविध प्रकल्पांची सुरुवात केली होती. त्याचबरोबर याआधी गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठ्या सभांना संबोधित केले आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: