पत्नी दिवस रात्र लाडू खायला घालते; पतीने मागितला घटस्फोट!

पत्नी दिवस रात्र लाडू खायला घालते; पतीने मागितला घटस्फोट!

उत्तर प्रदेशमध्ये घटस्फोटाचे एक अजब प्रकरण समोर आले आहे.

  • Share this:

मेरठ, 21 ऑगस्ट:  उत्तर प्रदेशमध्ये घटस्फोटाचे एक अजब प्रकरण समोर आले आहे. अजब म्हणण्याचे कारण असे की घटस्फोट कोणत्या वादामुळे अथवा विवाहबाह्य संबंध अशा नेहमी वाचण्यात येणाऱ्या कारणामुळे झालेला नाही. तर खाण्याच्या सवयीमुळे झाला आहे. होय, पत्नी एकच पदार्थ देते म्हणून घटस्फोटाची घटना मेरठमध्ये घडली आहे. पतीने पतीच्या या सवयीला कंटाळून घटस्फोट मागितला आहे.

मेरठ येथील एका पतीने पत्नी केवळ लाडू खायला घातले या गोष्टीला कंटाळून घटस्फोट मागितला. पतीची अशी तक्रार आहे की, पत्नी दिवस-रात्र लाडू खाण्यास देते. जेवण्यासाठी अन्य कोणतेही पदार्थ न बनवता केवळ लाडू खायला देणाऱ्या पत्नीला कंटाळून पतीने घटस्फोट मागितला. पतीने तर पत्नी तांत्रिकाच्या सांगण्यावरून असे करत असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित पती आजारी पडला होता तेव्हा पत्नी एका तांत्रिकाकडे केली होती. त्या तांत्रिकाने पतीला लाडू देण्याचा सल्ला दिला होता. आता हाच सल्ला दोघांच्या घटस्फोटाचे कारण ठरला आहे.

संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर दोघांनाही मार्गदर्शन केंद्रात पाठवण्यात आले. तेथे पतीने असा आरोप केला की, पत्नी सकाळी 4 आणि रात्री 4 लाडू खाण्यास देते. इतक नव्हे तर मधल्या काळात ती अन्य कोणताही पदार्थ खाण्यास देत नाही. विशेष म्हणजे या दोघांचा विवाह होऊन 10 वर्ष  झाली आहेत. घटस्फोटाच्या या अजब प्रकरणामुळे मार्गदर्शन केंद्रातील अधिकाऱ्यांना देखील प्रश्न पडला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, घटस्फोटासंदर्भात आम्ही दोघांना मार्गदर्शन करू शकतो. पण पत्नीच्या अंधश्रद्धेसंदर्भात आम्ही काहीच करू शकत नाही. पतीचा असा विश्वास आहे की लाडू खाल्ल्याने पतीची प्रकृती चांगली होईल.

पतीची प्रकृती चांगली होण्यासाठी लाडू खाणे हा एकमेव उपाय आहे, असा पत्नीचा विश्वास आहे.  या विषय वगळता ती अन्य सर्व गोष्ट मान्य करण्यास तयार, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

First published: August 21, 2019, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading