काळाचा घाला ! मिनी ट्रकला वाहनाची जोरदार धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू

काळाचा घाला ! मिनी ट्रकला वाहनाची जोरदार धडक, 9 जणांचा जागीच मृत्यू

भरधाव येणाऱ्या मिनी ट्रकला एका अज्ञात वाहनाची धडक बसल्यानंतर भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

लखनौ, 22 जुलै : भरधाव येणाऱ्या मिनी ट्रकला एका अज्ञात वाहनाची धडक बसल्यानंतर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू जागीच मृत्यू झाला असून 18 लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे. रविवारी रात्री (21 जुलै)उशिरा रात्री हा अपघात झाला. उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील ही दुर्घटना आहे.  मृत पावलेले सर्वजण धौलाना येथील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली लोक मिनी ट्रकमधून लग्न समारंभाहून घराकडे परतत होती. यावेळेस काळानं त्यांच्यावर घाला घातला.

हाफिजपूर पोलीस ठाणे परिसराजवळ आल्यानंतर एका अज्ञात वाहनानं या ट्रकला जोरदार धडक दिली. यात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या नादात ही दुर्घटना घडली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

(पाहा : VIDEO: 'गर्दी झाली म्हणून पाहायला गेलो अन् समोर भाऊच रक्ताच्या थारोळ्यात होता')

(पाहा :पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू)

दरम्यान, 20 जुलै रोजी महाराष्ट्रातही भीषण अपघात झाला होता.  पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यात पुण्यातील 9 महाविद्यालयीन विद्यार्थी मृत्युमुखी पडले.  वीक एंडनिमित्त सर्वजण पावसाळी पिकनिकसाठी रायगडवर निघाले होते. यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.

(पाहा : पोलिसांचा आता नवा फंडा, खाद्यांवर लागणार LED दिवे)

पुणे विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, असा आहे वाद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 08:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading