गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन मजली इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू

गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन मजली इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू

सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका घरात आग लागली आणि स्फोटात दोन मजली इमारत कोसळली. जेव्हा स्फोट झाला तेव्हा घरामध्ये 12हून अधिक जण होते.

  • Share this:

मऊ, 14 ऑक्टोबर: गॅस सिलिंडर(Gas Cylinder)चा स्फोटामुळे दोन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू  झाला. या घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिस (Police)आणि अग्निशमन दल (Fire Brigade)दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशमधली मऊ येथील मोहम्दाबाद परिसरात ही घटना घडली आहे.

सकाळी साडेसातच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका घरात आग लागली आणि स्फोटात दोन मजली इमारत कोसळली. जेव्हा स्फोट झाला तेव्हा घरामध्ये 12हून अधिक जण होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जण जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. पूर्ण इमारतच कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी जेसीबीच्या मदताने ढिगारा काढण्याचे काम सुरु आहे. जखमींना तातडीने उपचार मिळावेत आणि रुग्णालयात नेता यावे म्हणू्न रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात आली आहे.

इतर बातम्या - 'प्रकाश आंबेडकरच होणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री'

या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित घटनेतील लोकांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यासाठी आम्ही एनडीआरएफच्या पथकाला बोलवल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

इतर बातम्या - प्रचाराचा शेवटचा आठवडा, केंद्रीय मंत्रीही राजकीय फड गाजवणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2019 11:25 AM IST

ताज्या बातम्या