मोठ्या आवाजात गाणी ऐकायचा दुकानदार, वैतागून शेजाऱ्याने झाडल्या गोळ्या

उत्तर प्रदेशच्या मथुराजवळील बलदेव स्टेशन परिसरातील सरकंड नामक या खेडे गावात दोन दुकानदारांमध्ये गाण्याच्या मोठ्या आवाजावरून वाद झाला. या वादातून दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला चक्क गोळी मारली.

उत्तर प्रदेशच्या मथुराजवळील बलदेव स्टेशन परिसरातील सरकंड नामक या खेडे गावात दोन दुकानदारांमध्ये गाण्याच्या मोठ्या आवाजावरून वाद झाला. या वादातून दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला चक्क गोळी मारली.

  • Share this:
उत्तर प्रदेश, 24 एप्रिल : मोठ्याने गाणं लागलं की हल्ली आपण लगेच डान्स करायला लागतो. पण उत्तर प्रदेशमध्ये गाण्याच्या मोठ्या आवाजाला कंटाळून थेट गोळ्या झाडण्यात आल्या. उत्तर प्रदेशच्या मथुराजवळील बलदेव स्टेशन परिसरातील सरकंड नामक या खेडे गावात दोन दुकानदारांमध्ये गाण्याच्या मोठ्या आवाजावरून वाद झाला. या वादातून दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला चक्क गोळी मारली. गोळी घालणाऱ्याला गीतमला सध्या पोलिसांनी अटक केली आहे. बलदेव पोलीस स्टेशनचे अधिकारी सूरज प्रकाश शर्मा यांच्या सांगण्यानुसार, '१६ वर्षीय पुष्पेंद्र त्याच्या दुकानात मोठ्याने गाणे ऐकत बसला होता. शेजारील गीतमने त्याला गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितलं. यावरून दोघांमध्ये भांडणं झाली. पण पुष्पेंद्रने गाण्याचा आवाज काही कमी केला नाही. यावर वैतागून गीतम घरी गेला, गावठी बंदूक घेऊन आला आणि पुष्पेंद्रवर गोळी झाडली. यामध्ये पुष्पेंद्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला सरकारी रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी आग्र्याला नेण्यात आलं आहे. हा प्रकार पाहणाऱ्या गावकऱ्यांनी मिळून गीतमला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांच्या तक्रारीनंतर आता गीतमला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  
First published: