• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • धक्कादायक! 6 वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, नराधम मृतदेहाचे करत होते बारीक-बारीक तुकडे

धक्कादायक! 6 वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या, नराधम मृतदेहाचे करत होते बारीक-बारीक तुकडे

दोन युवकांनी मिळून एका 6 वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 • Share this:
  लखनौ, 9 ऑगस्ट : लोकांमध्ये माणुसकी उरली आहे की नाही? असा प्रश्न निर्माण करणारी घटना घडली आहे. दोन युवकांनी मिळून एका 6 वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करण्याचा प्रयत्न केला. थरकाप उडवणारा हा प्रकार दिवसाढवळ्या घडला आहे. या निष्पाप चिमुकल्याचा जीव घेतल्यानंतर हे दोघं जण अतिशय थंड डोक्यानं मुलाच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करत असताना एका महिलेनं पाहिलं आणि आरडाओरडा केला. त्यावेळेस दोघांचाही गोंधळ उडाला आणि मृतदेह तिथेच टाकून ते पळाले. उत्तर प्रदेशातील मथुरा जनपद परिसरातील ही घटना आहे. पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर पुरी कॉलनीतील रहिवासी जयप्रकाश यांच्या पत्नी गुरुवारी (8 ऑगस्ट) आपल्या मोठ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. तेव्हा त्यांचा छोटा मुलगा योगेश घरातच होता. काही वेळानं त्या घरी परतल्या पण योगेश त्यांना कुठेच सापडत नव्हता. मुलगा अचानक गायब झाल्यानं तणावात आलेल्या कुटुंबीयांनी योगेशसाठी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. (पाहा : आजीने प्राण सोडले पण नातवाला सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO) मुलगा नाही तर सापडला त्यांचा मृतदेह... योगेशला शोधत त्याचे आई-बाबा घरापासून जवळपास 500 मीटर अंतरावर पोहोचले. तेव्हा त्यांना एका ठिकाणी प्रचंड गर्दी दिसली. नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी जेव्हा त्याचे आई-बाबा गर्दीजवळ पोहोचले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांना आपलाच मुलगा योगेशचा रक्तानं माखलेल्या अवस्थेततला मृतदेह रस्त्यावर दिसला. मुलाला मृतावस्थेत पाहून त्याच्या आईची शुद्धच हरपली. (वाचा : आतेभावासोबत प्रेमसंबंध.. चहाच्या कपवरील 'लिपस्टिक'मुळे उलगडलं हत्येचं गूढ) योगेशचा मृतदेह सर्वात आधी पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी मल्लो देवी यांनी सांगितलं की, दुपारच्या सुमारास बाईकवरून आलेले दोन तरुण योगेशच्या मृतदेहाचे तुकडे करत होते. अंगावर काटा आणणारी ही गोष्ट पाहिल्यानंतर महिलेनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा योगेशचा मृतदेह तिथेच टाकून हे दोघंही पसार झाले. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी योगेशच्या मृतदेहासह हायवेवर आंदोलन करत चक्का जाम आंदोलन केलं. परिस्थिती गंभीर होत असल्याचं पाहून स्थानिक पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं आश्वासन आंदोलकांना दिलं. यानंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं. (पाहा :तुझ्यासाठी जीव झाला येडा पिसा! महिला पोलीस गँगस्टरच्या प्रेमात घायाळ, थाटलं लग्न) SPECIAL REPORT: महापुरामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, दरांमध्ये दुप्पट वाढ!
  Published by:Akshay Shitole
  First published: