VIDEO: बंदूक घेऊन 2 तास माथेफिरूचा छतावर डान्स, सिक्युरिटी गार्डवर केला गोळीबार

VIDEO: बंदूक घेऊन 2 तास माथेफिरूचा छतावर डान्स, सिक्युरिटी गार्डवर केला गोळीबार

डीजे वाजवण्याच्या मागणीवरून हा तरुण गोळीबार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • Share this:

मेरठ, 09 जुलै: हातात बंदूध घेऊन छतावर नाचणाऱ्या एक तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 2 तास हा व्यक्ती घराच्या छतावर नाचत होता. त्याच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि बँकेच्या सुरक्षारक्षकाला लागली. या माथेफिरूनला यापूर्वी गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर हा तरुण बाहेर होता. आता पुन्हा एखदा छतावर नाचताना माथेफिरूनं गोळीबार केला.

माथेफिरूनं केलेल्या गोळीबारात सिंडिकेट बँकेच्या गार्डला गोळी लागली. यामध्ये गार्ड जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माथेफिरूवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती.

डीजे वाजवण्याच्या मागणीवरून हा तरुण गोळीबार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही डीजेनेच्या मागणीवर गोळीबार केला आहे. श्रीपाल उर्फ ​​काळू असे आरोपीचे नाव आहे. या व्यक्तीने पूर्वी तरुणावर गोळी झाडली होती. डीजे लावला नाही तर गोळीबार करेन अशी धमकी हा माथेफिरू देत होता. स्थानिकांनी त्याचा गोंधळ ऐकून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र माथेफिरून अखेर गोळीबार सुरू केला. यामध्ये गार्डच्या हाताला गोळी लागल्यानं जखमी झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 9, 2020, 7:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading