Home /News /national /

बाप रे! COVID-19 कंट्रोल रूममध्ये आधी मागवले समोसे नंतर दिली पानाची ऑर्डर

बाप रे! COVID-19 कंट्रोल रूममध्ये आधी मागवले समोसे नंतर दिली पानाची ऑर्डर

अशी मस्करी किंवा असे प्रकार तातडीनं थांबवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

    रायपूर, 30 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव देशभरात वाढत असल्यानं देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजारहून अधिक झाली आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात न घेताच उत्तर प्रदेशात दोन जणांनी अजब प्रकार केल्याचं समोर आलं आहे. रविवारी संध्याकाळी रायपूर जिल्ह्या प्रशासनाच्या कंट्रोलरूममध्ये फोन करून समोसे आणि चटणी मागवली. त्यानंतर पुन्हा काही मिनिटांनी आणखी एक फोन आला. हा फोन ऐकून तरी प्रशासनाचे अधिकारीही चक्रावले. यामध्ये समोरच्या व्यक्तीनं चक्क खायचं पान पाठवून द्या अशी ऑर्डर केली होती. रायपूर कोतवाले पोलीस ठाणे क्षेत्र परिसरात हा अजब प्रकार घडला. वडील आणि मुलानं मिळून पान आणि समोशाच्या ऑर्डर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मोहल्ला कुचा फरगाना येथे वडिलांनी मुलाला कंट्रोल रूममध्ये फोन करून पॅन पाठविण्याची मागणी केली. कॉल करणाऱ्यांने सांगितले मी पान खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पान पाठवण्याची व्यवस्था करा. त्यांच्या या फोनमुळे प्रशासनाचे अधिकारी बुचकळ्यात पडले. कोतवाली पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीच्या घरी पाठवून पुन्हा असे न कऱण्याचा इशारा दिला आहे. हे वाचा-मोबाईल व्हायब्रेट तर समजा जवळच कोरोनाचा रुग्ण,अॅप डाऊनलोड करणे पडले महागात मुलानं आधी केली होती समोशाची मागणी आधी प्रशासनाच्या कंट्रोलरुमध्ये मुलानं समोसा आणि चटणी पार्सल पाठवून देण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला कडक इशारा दिला. असे कॉल प्रशासन आणि पोलिसांनी केले ब्लॉक रामपूरचे मुख्य पोलीस अधिकारी शगुन गौतम म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीचं साधं गांभीर्यही काही लोकांना कळत नाही. अशा पद्धतीचे फोन करून प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचं काम करतात. असे फोन कॉलयेण आता नेहमीचं झाल्यानं डोक्याला ताप झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांनी असे फोन केले. अशा प्रकारच्या कॉलमुळे या कठीण काळात काम करण्यात अडचण निर्माण होतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे असे फोन ब्लॉक करण्यात येतील शिवाय समाजात जाहीरपणे अशांची नाव उघड करण्यात येतील. त्यामुळे अशी मस्करी किंवा असे प्रकार तातडीनं थांबवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. हे वाचा-Lockdown:लेकराच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घ्यावं लागलं VIDEO CALLवर, वडील म्हणाले
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Rampur, Uttar pradesh

    पुढील बातम्या