फिर राम मंदिर ! उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 18 खासदारांसह घेणार रामलल्लाचं दर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 07:26 AM IST

फिर राम मंदिर ! उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 18 खासदारांसह घेणार रामलल्लाचं दर्शन

लखनौ, 16 जून : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काही खासदार शनिवारीच (15 जून) रात्री उशिरा अयोध्येत दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबीयदेखील पहाटेच मुंबईहून अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ठाकरे कुटुंबीय अयोध्येत पोहोचतील, अशी माहिती आहे. यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील. लोकसभा निवडणूक 2019मध्ये विजयी झालेल्या सर्व खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.

आजच्या अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरे राम मंदिर निर्माणाचाही मुद्दा उचलून धरतील, असं म्हटलं जात आहे.

(पाहा :बर्निंग कारचा थरार! धावत्या कारनं भररस्त्यात घेतला अचानक पेट)

हे खासदार अयोध्येत दाखल

रामलल्ला दर्शनासाठी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, संजय यादव, सदाशिव लोखंडे, ओम राजे यांच्यासहीत काही खासदार अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे प्रदेश उप प्रमुख अभय द्विवेदी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Loading...

असा असेल अयोध्या दौरा

राम मंदिर उभारणीचा अजेंडा घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातच अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी होईल आणि आमच्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सुप्रीम कोर्ट आहेत, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत शनिवारीच (15 जून) अयोध्येत पोहोचले आहेत. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही तर आस्थेचा विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले. राम मंदिराबद्दल भाजप पुढची रूपरेखा ठरवेल. कारण शिवसेना हा एनडीएचा एक घटकपक्ष आहे, असं संजय राऊत म्हणाले.

(पाहा : VIDEO : 'लारा'चा दरारा, 3 बछड्यांसह'लारा'चा दरारा, 3 बछड्यां अडवला अवघा रस्ता!)

दरम्यान, यापूर्वी उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेंबर 2018 ला अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. राम मंदिराबद्दल सरकारवर दबाव आणण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, सगळ्यांचे आभार. संतांचे आभार. संतांच्या आशिर्वादाशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. देशातलेच नाही तर परदेशातले हिंदूही राम मंदिराची वाट बघत आहेत.

SPECIAL REPORT: लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंचं आधी सरकार फिर 'राम मंदिर'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 07:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...