'नथुराम आणि प्रज्ञा ठाकूर सारखे लोक मदरशांमध्ये जन्माला येत नाहीत'

'नथुराम आणि प्रज्ञा ठाकूर सारखे लोक मदरशांमध्ये जन्माला येत नाहीत'

'दहशतवादाचं उदात्तीकरण करू नये, प्रज्ञा ठाकूर आणि गोडसे कुठे तयार झाले हे जगाला माहित आहे.'

  • Share this:

लखनऊ12 जून : कायम वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय. नथुराम गोडसे आणि प्रज्ञा ठाकूर सारखे लोक हे मदरशांमध्ये जन्म घेत नाहीत. असे लोक कुठे जन्म घेतात हे जगाला कळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया खान यांनी व्यक्त केली. मदरशांचं आधुनिकीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने जाहीर केला होता. त्यावर आझम खान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या आधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले होते.

दहशतवादाचं उदात्तीकरण करू नये, प्रज्ञा ठाकूर आणि गोडसे कुठे तयार झाले हे जगाला माहित आहे. मदरशांमध्ये आधीपासूनच गणित, इंग्रजी कॉम्प्युटर हे विषय शिकवले जातात त्यात नवीन असं काही नाही. त्यापेक्षा मदरशांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं मदत करावी असा सल्लाही त्यांनी दिला.

काय आहे सरकारचा निर्णय?

मुस्लिम मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या देशातल्या मदरशांचं आधुनिकीकरण करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. इतर पारंपरिक विषयांसोबतच मदरशांमध्ये कॉम्प्युटर, गणित आणि इंग्रजी भाषाही शिकविली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. यासाठी केंद्र सरकार निधी देणार असून हा दूरगामी परिणाम करणारा निर्णय असेल अशी माहितीही त्यांनी दिली. याचबरोबर मदरशांमधल्या 5 कोटी मुला-मुलींना विशेष स्कॉलरशीपही देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाचं बजेट दुप्पट केलं आहे. या आधी दोन हजारकोटी रुपये असलेल्या या मंत्रालयाला आता 5 हजार कोटींपेक्षा जास्त निधी मिळणार आहे. या निर्णयामुळे मुस्लिम समाजातल्या गरीब-मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळेल असंही अब्बास यांनी सांगितंलं.

देशातल्या मदरशांची प्रतिमा लोकांमध्ये चांगली नाही. इथं कट्टरतावादाचं शिक्षण दिलं जाते अशी सार्वत्रिक भावना आहे. तर अनेक मदरशांचा वापर कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी करण्यात येतो असंही आढळून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार तुष्टीकरणाचा विचार न करता किंवा फक्त मतं मिळावेत म्हणून असे निर्णय घेत नाही तर समाजाच्या सर्वांगिण कल्याणाचा विचार त्यामागे आहे असं मतही अब्बास यांनी व्यक्त केलं.

First published: June 12, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading