उत्तर प्रदेशात मोदींच्या अडचणी वाढणार, सपा-बसपा आघाडीत काँग्रेसचाही हात

काँग्रेस, सपा आणि बसपाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून निवडणुकांची तारखा जाहीर होण्याच्या आधी या महाघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 03:18 PM IST

उत्तर प्रदेशात मोदींच्या अडचणी वाढणार, सपा-बसपा आघाडीत काँग्रेसचाही हात

नवी दिल्ली 7 मार्च  : लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बसपा आणि सपाने आघाडी केल्याने भाजपला मोठा पर्याय निर्माण झाला होता. आता भाजपची आणखी डोकेदुखी वाढणार आहे. या आघाडीत काँग्रेसलाही सोबत घेण्याची तयारी दोनही पक्षांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राज्यात कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

दिल्लीचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो असं राजकारणात म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे लोकसभेच्या सर्वात जास्त 82 जागा उत्तर प्रदेशात आहे. भाजपचं आव्हान रोखायचं असेल तर एकट्या पक्षाला लढणं सोपं नाही याची जाणीव बसपा आणि सपाला झाल्याने त्यांनी दोन दशकांचं वैर संपून मैत्री केली. मात्र जास्त जागा सोडण्याची तयारी नसल्याने काँग्रेस या आघाडीत सहभागी झाली नाही. 2014 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला तब्बल 72 जागा मिळाल्या होत्या.

मात्र आता सर्वच पक्षांनी नमतं घेतल्याने काँग्रेसही या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी 15 जागा सोडण्याची तयारी या पक्षांनी दाखवलीय. समाजवादी पक्ष 7 तर बसपा 6 जागा सोडणार आहेत. या आधी 10 जागा देण्याचा प्रस्ताव प्रियांका गांधी यांनी फेटाळला होता. या संदर्भात काँग्रेस, सपा आणि बसपाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून निवडणुकांची तारखा जाहीर होण्याच्या आधी या महाघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रियांका गांधीसमोर ही आहेत पाच आव्हाने

1) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे- 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा ऐतिहासिक पराभव झाला होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसला इतक्या कमी जागा मिळाल्या नव्हत्या जितक्या 2014मध्ये मिळाल्या. या पराभवानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा डिसेंबरमध्ये 3 राज्यातील विजयामुळे काही प्रमाणात कमी झाली. पण उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अद्याप काँग्रेस पक्ष मजबूत नाही. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याची असेल. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्यास काँग्रेसच्या जागा वाढण्यास मदत होऊ शकते.

Loading...

2) विजय मिळवून देण्याचे आव्हान- 2014मध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या जागांवर यंदा विजय मिळवून देण्याचे महत्त्वाचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. त्यामुळे दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये अधिक जागा मिळवणे गरजेचे आहे. प्रियांका गांधी यांनी जर दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर काँग्रेसला यश मिळवून दिले तर त्यांच्या जागा दुप्पट होऊ शकतील.

3) मोदी-योगी यांच्याशी थेट लढत- प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशमधील ज्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो भाग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. तसेच पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघ देखील पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येतो. त्यामुळेच मोदी आणि योगी यांच्या बाल्लेकिल्ल्यात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असेल.

4) उमेदवारांची निवड- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याचे सर्वात मोठे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध लढताना विजयी होणारा आणि विश्वासू अशा उमेदवाराची निवड प्रियांका यांना करावी लागणार आहे.

5) गांधी कुटुंबावरील आरोपांना तोंड देणे- पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून सातत्याने गांधी कुटुंबावर आरोप केले जातात. या आरोपांना यापुढे प्रियांका गांधी यांना उत्तर द्यावे लागेल. निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक आरोपाला प्रियांका कशा पद्धतीने उत्तर देतात त्यावर देखील काँग्रेसचे यश ठरणार आहे.

जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यात 29 जण जखमी, पाहा घटनास्थळावरचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...