बिजनौर, 9 एप्रिल : प्रियांका गांधींच्या उत्तर प्रदेशातील बिजनौर इथल्या 'रोड-शो' दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आपसात भिडले. बिजनौर इथे 'रोड-शो' सुरू असताना अचानक काही भाजप कार्यकर्त्यांनी 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा दिल्या. यावेळी प्रियांका यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे पाहात त्यांच्या दिशेनं फुलांचे हार फेकले. पण भाजप कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Priyanka gandhi