धार्मिक कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू, LIVE VIDEO व्हायरल

धार्मिक कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू, LIVE VIDEO व्हायरल

धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

लखनौ, 8 ऑक्टोबर : धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निधन झालेल्या काँग्रेसच्या नेत्याचं नाव एहतेशाम रिझवी असं होतं. धार्मिक कार्यक्रमादरम्यान एहतेशाम रिझवी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तेथेच जमिनीवर कोसळले. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील ही घटना आहे.

(वाचा :  पोलिसाच्या बायकोची दबंगगिरी, टोल मागितला म्हणून केली नाक्याची तोडफोड)

मिळालेल्या माहितीनुसार, एहतेशाम रिझवी हे दरियाबाद येथील काँग्रेस समर्थित नगरसेवक होते. एका धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यादरम्यान, त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. यानंतर रिझवींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एहतेशाम रिझवी हे 65 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

(वाचा :'मला अटक केली तरी चालेल, पण...' ; शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज)

(वाचा :फडणवीस सरकारवर उद्धव ठाकरेंचा 'गोलमाल' केल्याचा खळबळजनक आरोप)

CCTV VIDEO: सुरक्षारक्षकांनी ACZमध्ये जाण्यास रोखलं; तरुणांनी केली बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या