मराठी बातम्या /बातम्या /देश /Uttar pradesh lakhimpur kheri : लखीमपूर हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Uttar pradesh lakhimpur kheri : लखीमपूर हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील निघासन कोतवाली परिसरात, पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून, 24 तासांच्या आत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. (Uttar pradesh lakhimpur kheri)

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील निघासन कोतवाली परिसरात, पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून, 24 तासांच्या आत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. (Uttar pradesh lakhimpur kheri)

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील निघासन कोतवाली परिसरात, पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून, 24 तासांच्या आत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. (Uttar pradesh lakhimpur kheri)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

लखीमपूर खेरी, 15 सप्टेंबर : लखीमपूर खेरी जिल्ह्यातील निघासन कोतवाली परिसरात, पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून, 24 तासांच्या आत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. (Uttar pradesh lakhimpur kheri) अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मुलींना आमिष दाखवून शेतात घेऊन गेले होते. जिथे त्याच्या संमतीशिवाय त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचा गळा दाबून खून करून दोघांचेही मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला.

पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली, अटक करण्यात आलेले सहाही आरोपी हे मित्र आहेत. मयत बहिणींच्या शेजारी राहणारा आरोपी छोटू याच्यामार्फत या दोन्ही मुलींची आरोपीशी ओळख झाली. बुधवारी दुपारी तीन आरोपींनी दोघी बहिणींना आमिष दाखवून शेतात नेले होते.

हे ही वाचा : सलमान खानला मारण्यासाठी पूर्ण तयार होता Plan, घरापर्यंत असे पोहोचले शूटर

दरम्यान ते शेतात गेल्यानंतर जुनैद आणि सोहेलने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. बलात्कारानंतर दोन्ही बहिणींनी लग्नासाठी दबाव टाकला असता आरोपींनी दोघींचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जुनैद आणि सोहेल यांना झाडाला लटकवण्यात हफिजुल, आरिफ आणि करीमुद्दीन यांनी मदत केल्याचे सांगण्यात आले आहे.

दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सोहेल आणि जुनैद यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. जुनैदला पोलिसांनी गुरुवारी सकाळीच अटक केली. त्या दोघांचा पाठलाग करताना त्याच्या पायाला गोळी लागली आहे. याशिवाय छोटू, हाफिजुल, आरिफ आणि करीमुद्दीन यांनाही अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : Aurangabad Police : खाकीवाल्यानेच केली चोरी, चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच सराफ व्यापाऱ्याला लुटले

सध्या चौकशी प्राथमिक टप्प्यात आहे. दोन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात येत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. सध्या या प्रकरणी बलात्कार, खून आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला  असल्याचे पोलीस अधिक्षक म्हणाले.

First published:

Tags: Crime news, Rape case, Up crime news, Uttar pradesh, Uttar pradesh news