संतापजनक ! हँडपंपवर पाणी भरण्यास गेलेल्या दलित महिलेला विवस्त्र करून अमानूष मारहाण

संतापजनक ! हँडपंपवर पाणी भरण्यास गेलेल्या दलित महिलेला विवस्त्र करून अमानूष मारहाण

सरकारी हँडपपमधून पाणी भरणं एका दलित कुटुंबाला प्रचंड महागात पडलं आहे.

  • Share this:

लखनौ, 10 जून : सरकारी हँडपपमधून पाणी भरणं एका दलित कुटुंबाला प्रचंड महागात पडलं आहे. स्पृश्य-अस्पृश्यतेचा आरोप करत स्थानिकांनी एका दलित मुलाला आणि त्याच्या आईला विवस्त्र करत अमानूष मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यानंतर जेव्हा पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली, तेव्हा उलटसुटल बोलून तिची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. यानंतर पीडितेनं पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील ही संतापजनक घटना आहे. 21व्या शतकातही स्पृश्य-अस्पृश्यतेचा घटना घडत असल्यानं याविरोधात सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

(पाहा :VIDEO : सोलापूरमध्ये अग्नितांडव, दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान)

नेमकं काय आहे प्रकरण ?

कौशांबी येथील लोध पुरवा गावामध्ये एक दलित मुलगा सरकारी हँडपंपवर पाणी भरण्यास गेला होता. यावेळेस स्थानिकांनी त्याला अमानूष मारहाण केली. यास मुलाच्या आईनं विरोध केला तर गुंडगिरी करणाऱ्यांनी तिला विवस्त्र करून मारहाण केली. यानंतर पीडित महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली, पण तिथेही कोणी म्हणणं ऐकून न घेतल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

(पाहा : शरद पवारांचा पॉलिटिकल 'एअर स्ट्राईक' पाहा SPECIAL REPORT)

यानंतर न्यायासाठी महिलेनं पोलीस अधीक्षकाकडे धाव घेतली, तर कौशांबीतल्या पोलिसांनी तिला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली जाऊ नये, यासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आला होता. तडजोड करण्यास पीडितेनं नकार दर्शवल्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. प्रसिद्धी माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आता पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश देत कारवाईचे निर्देश दिले आहेत.

VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ

First published: June 10, 2019, 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading