पावती फाडण्यावरून वाद, महिलेसमोर पोलिसांनी तरुणाला केलेल्या बेदम मारहाणीचा VIDEO VIRAL

पावती फाडण्यावरून वाद, महिलेसमोर पोलिसांनी तरुणाला केलेल्या बेदम मारहाणीचा VIDEO VIRAL

आरटीआय कार्यकर्ते दानिश खान यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की त्याच्या मित्राची पत्नी कुटुंबासमवेत जात असताना हा प्रकार घडला आहे.

  • Share this:

बुलंदशहर, 15 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी पोलिसांनी लाच घेतल्याचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्याच राज्यातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. गाडीची पावती फाडताना पोलिसानं महिलेला अर्वाच्च भाषा वापरत सोबत असलेला तरुणाला बेदम मारहाण केली आहे. पोलिसांनी पोटावर लाथ मारल्याचा आरोप देखील महिलेनं केला आहे. तर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

यूपी पोलिसांच्या मनमानीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहन तपासणी दरम्यान युवकाला महिलांसमोर कानपूर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलिसांनी महिलेच्या पोटावर लाथ मारत अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हे वाचा-VIDEO : नागपुरातील दुकानात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

रामपूर येथील आरटीआय कार्यकर्ते दानिश खान यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की त्याच्या मित्राची पत्नी कुटुंबासमवेत जात असताना हा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरात हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या पोलिसाची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून त्यावर तातडीनं कारवाई देखील करावी असं नागरिकांचं म्हणणं आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण पोलिसांना विचारत आहे की तपासणी दरम्यान आपण अशा कोणाला मारहाण कशी करू शकता. परंतु व्हिडीओमध्ये प्रत्युत्तर देण्याऐवजी पोलीस त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 15, 2020, 9:12 AM IST

ताज्या बातम्या