हिंदू समाज पार्टी नेत्याच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन, नागपुरातून एकाला अटक

कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशातलं वातावरण तणावपूर्ण बनलं असून पोलीस सर्व खबरदारी घेत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 08:17 PM IST

हिंदू समाज पार्टी नेत्याच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन, नागपुरातून एकाला अटक

नागपूर 22 ऑक्टोंबर : उत्तर प्रदेशातल्या हिंदू समाज पार्टी नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी नागपुरातून एका संशयीत आरोपीला अटक केलीय. या आरोपीला लखनऊ इथं नेण्यात आलंय. असिम असं या आरोपीचं नाव आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून महत्त्वाचे धागे दोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय. या प्रकरणी चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती बाहेर येत असून त्या सर्वांना एका सूत्रात जोडण्याचं काम पोलिस करत आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत 200 जणांची चौकशी करण्यात आलीय. काही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन खास पथकं स्थान केली आहेत.

अरे देवा...उंदरांनी शेतकऱ्यांच्या खाल्ल्या 50 हजारांच्या नोटा!

कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून देण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. अश्फाक आणि मोइनुद्दीन पठाण या दोन आरोपींना पकडण्यासाठी हे इनाम आहे. कमलेश तिवारी हत्याकांडामधल्या 3 संशयितांना गुजरात एटीएस ने ताब्यात घेतलं होतं. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. त्याचबरोबर आणखी दोन संशयित शाहजहाँपूरमध्ये दिसल्याची खबर आहे. हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची 18 ऑक्टोबरला लखनऊच्या त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातले मुख्य आरोपी शेख अशफाक हुसेन आणि पठाण मोइनुद्दीन अहमद हे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. या दोघांचा शेवटचा ठावठिकाणा हरियाणाच्या अंबालाजवळ मिळाला आहे. हे ठिकाण वाघा बॉर्डरपासून 285 किमी दूर आहे.

Infosysला सर्वात मोठा झटका; काही मिनिटातच 45 हजार कोटी बुडाले!

कमलेश तिवारी हत्याकांड प्रकरणी गुजरातमधल्या सुरतमधून 3 आणि उत्तर प्रदेशातून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात बिजनौरच्या दोन मौलानांचा यामध्ये हात आहे का याबदद्लही तपास सुरू आहे. या दोन मौलानांनी कमलेश तिवारी यांची हत्या करण्यासाठी दीड कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...