कमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक

हिंदू समाज पार्टीचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून देण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाखांचं इनाम जाहीर केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 10:32 PM IST

कमलेश तिवारी हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपींना गुजरात ATS ने केली अटक

गांधीनगर 22 ऑक्टोंबर : उत्तर प्रदेशातल्या हिंदू समाज पार्टी नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालंय. या प्रकरणात पोलिसांना पाहिजे असलेले मुख्य आरोपी अश्फाक आणि मोईउद्दीन पठाण यांना गुजरातATSने अटक केलीय. गुजरात राजस्थान सीमेजवळच्या शामलजी इथं ही अटक करण्यात आलीय. हे दोघही आरोपी गुजरातमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे गुजरातATS ने खास पथकं तयार केली होती. त्यांनी माग काढत या दोनही आरोपींना अटक अटक केल्याची माहिती गुजरातATS चे डीआयजी हिमांशू शुक्ला यांनी दिलीय. या अटकेमुळे पोलिसांना मोठं यश मिळालंय. या दोनही आरोपींची माहिती देणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठं बक्षीस जाहीर केलं होतं.

जम्मू काश्मीर : घरात दडून बसलेले 3 अतिरेकी ठार; सुरक्षा दलांची कारवाई

या प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलंय. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी नागपुरातून एका संशयीत आरोपीला अटक केलीय. या आरोपीला लखनऊ इथं नेण्यात आलंय. असिम असं या आरोपीचं नाव आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून महत्त्वाचे धागे दोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय. या प्रकरणी चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती बाहेर येत असून त्या सर्वांना एका सूत्रात जोडण्याचं काम पोलिस करत आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत 200 जणांची चौकशी करण्यात आलीय. काही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन खास पथकं स्थान केली आहेत.

'पंतप्रधानांनी मला सांगितलं, कसं मोदीविरोधात बोलण्यास भाग पाडतात'

Loading...

कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या मारेकऱ्यांना पकडून देण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाखांचं इनाम जाहीर केलं होतं. अश्फाक आणि मोइनुद्दीन पठाण या दोन आरोपींना पकडण्यासाठी हे इनाम होतं. कमलेश तिवारी हत्याकांडामधल्या 3 संशयितांना गुजरात एटीएस ने ताब्यात घेतलं होतं. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. त्याचबरोबर आणखी दोन संशयित शाहजहाँपूरमध्ये दिसल्याची माहिती दिली जातेय. हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची 18 ऑक्टोबरला लखनऊच्या त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 10:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...