उत्तर प्रदेशात जेलमध्ये हातात पिस्तुल घेऊन गुंडांचं फोटोसेशन PHOTO व्हायरल

उत्तर प्रदेशात जेलमध्ये हातात पिस्तुल घेऊन गुंडांचं फोटोसेशन PHOTO व्हायरल

या गुंडांना जेलमध्ये सर्व सोई-सुविधा मिळत असल्याचंही बोललं जातं. हे गुंड जेलमध्ये पार्ट्या करता अशीही माहिती आता बाहेर आलीय.

  • Share this:

लखनऊ 26 जून : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पोलिसांना पूर्ण मोकळीक दिलीय. त्यामुळे चकमकींमध्ये ठार होणाऱ्या गुंडांचं प्रमाण वाढलंय. या धडक कारवाईचा गुंडांच्या टोळ्यांना धाकही निर्माण झालाय. हे खरं असलं तरी जेलमध्ये असलेल्या गुंडांच्या फोटोंनी खळबळ निर्माण केलीय. जेलमध्ये हातात पिस्तुलं घेऊन काही गुंडांनी फोटो काढलेत. हे फोटो आता व्हायरल झाले असून जेलच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. राज्य सरकारनेही या फोटोंची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशातल्या उन्नव जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले कुख्यात गुंड अंकुर आणि अमरेश यांचे हातात पिस्तुल घेतलेले फोटो व्हायरल झाले आहेत. या गुंडांना जेलमध्ये सर्व सोई-सुविधा मिळत असल्याचंही बोललं जातं. हे गुंड जेलमध्ये पार्ट्या करता अशीही माहिती आता बाहेर आल्याने त्यामुळे खळबळ उडालीय. उत्तर प्रदेशात गुन्हेगारी टोळ्यांचं चांगलच वर्चस्व आहे. राजकारण्यांशी या टोळ्या संबंधीत असल्याने त्यांना हात लावण्याची कुणाची हिंमत होत नाही असंही बोललं जातंय.

केरळ - जेलमध्ये सापडला मोबाईलचा साठा

कारागृहातली सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असते असा समज आहे. जेलमध्ये सर्वच गुन्ह्यांचे कैदी असल्याने सुरक्षा व्यवस्थेच कुठलीही त्रुटी राहू नये याची काळजी पोलीस घेत असतात. मात्र ही अभेद्य सुरक्षा व्यवस्था भेदून केरळमधल्या जेलमध्ये कैद्यांना सर्व सुविधा मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय. पोलिसांनी घातलेल्या छाप्यांमध्ये त्यांना ज्या काही वस्तू सापडल्या त्या पाहून जेलचे अधिकारी चक्रावून गेलेत. हे जेल आहे की धर्मशाळा? असा प्रश्न विचारण्यात येतोय.

केरळमधलं कन्नूर आणि त्रिशूरचं जेल हे महत्त्वाचं मानलं जातं. या जेलमध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यांचे कैदी असल्याने तिथे सुरक्षा व्यवस्थाही तशीच कडक असते. मात्र या सुरक्षाव्यवस्थेला धाब्यावर बसवून कैद्यांनी तिथे आपलंच राज्य निर्माण केल्याने सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.

जेल प्रशासनाकडे तक्रारी आल्याने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी जेलमध्ये छापा घातला. तेव्हा त्यांना ज्या वस्तू सापडल्या त्या पाहून सर्वच जण चक्रावून गेले. महागडे स्मार्ट फोन्स, फोन्सचे चार्जर्स, हेड फोन्स, चाकू, लोखंडी सळ्या आणि गांजा असा मुद्देमाल सापडला. कारागृहात कुठल्याही बाहेरच्या वस्तूंना नेण्यास बंदी आहे. असं असताना या गोष्टी मध्ये गेल्याच कशा असा आता प्रश्न निर्माण होतोय.

संगमताने कारभार

जेलच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय आतमध्ये या वस्तू जाणं शक्यच नाही. आरोपींकडून पैसे घेऊन आणि हफ्ते घेऊन या गोष्टी त्यांना दिल्या जातात. जेलमध्ये ड्रग्ज येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 05:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading