बायको सोडून गेली म्हणून पतीने क्राईम पेट्रोल स्टाईल केलं स्वत:चं अपहरण, पोलिसांना लागली खबर आणि...

बायको सोडून गेली म्हणून पतीने क्राईम पेट्रोल स्टाईल केलं स्वत:चं अपहरण, पोलिसांना लागली खबर आणि...

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे पत्नी घर सोडून गेली म्हणून पतीने स्वत:च्याच अपहरणाचे नाटक केले.

  • Share this:

हरदोई (उत्तर प्रदेश), 15 मार्च : उत्तर प्रदेशातील हरदोई येथे पत्नी घर सोडून गेली म्हणून पतीने स्वत:च्याच अपहरणाचे नाटक केले. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र हा सगळा प्रकार पोलिसांसमोर उघड झाल्यानंतर पुढे जे काही झालं त्याने सर्वांना हैराण केले.

पत्नी घर सोडून गेल्यानंतर इक्बाल नामक युवकाने आपल्याच भावाला त्याचे अपहरण करण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी पोलिसांना या अपहरणाबाबत माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांनी त्याचे अपहरण खोटे असल्याचे कळले. त्याची पत्नी नातेवाईकांकडे गेल्यामुळे तिला परत बोलवण्यासाठी पतीने हे सगळे नाटक केले होतोे. मात्र पोलिसांचा वेळ घालवल्याप्रकरणी इक्बालवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

वाचा-दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवलं, हत्येनंतर डोकं कापून नदी फेकलं

'माझी पत्नी आली, आता मला सोडा'

पोलिसांनी इक्बालच्या पत्नीला याबाबत माहिती दिल्यानंतर ती परत आली. त्यानंतर इक्बालने, “माझी पत्नी तिच्या मेहुण्याच्या घरी गेली होती आणि बरेच फोन केले तरी परत येत नव्हती. तिला घाबरवण्यासाठी मी अपहरणाचे नाटक केले. बसस्थानकावरून मी माझा भाऊ हसीबला फोन केला आणि माझे अपहरण करण्यास सांगितले”, अशी माहिती पोलिसांना दिली. तसेच, “पोलिसांना त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता, परंतु माझ्या भावाने माझ्या पत्नीला फोन केला नाही आणि घाईत पोलिसांना फोन केला आणि मी अडकलो. आता माझी पत्नी आली आहे. मला क्षमा कर“, अशी विनंतीही पोलिसांना केली.

वाचा-धक्कादायक! भारतीय पेहराव केला म्हणून तरुणीला रेस्टॉरंटने दिली नाही एन्ट्री, पाहा

पत्नीनेही पतीला सोडण्याची विनंती केली

यासंदर्भात एसपी अमित कुमार म्हणाले की, जे योग्य ती कारवाई केली जाईल, ती केली जाईल. तसेच, इक्बालच्या पत्नीने पोलिसांकडे आपल्या नवऱ्याला सोडण्याची विनंतही केली आहे.

First published: March 15, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या