मराठी बातम्या /बातम्या /देश /

Lockodow मुळे काम बंद; घरातलं अन्न-पाणी संपलं, पाहा या कुटुंबीयांचे जिवंतपणीच कसे झालेत सापळे

Lockodow मुळे काम बंद; घरातलं अन्न-पाणी संपलं, पाहा या कुटुंबीयांचे जिवंतपणीच कसे झालेत सापळे

डॉ. अमित यांनी सांगितलं की, एक महिला आणि तिच्या पाच मुलांना प्रभाग क्रमांक 8 मध्ये दाखल केलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्या लोकांनी काहीही खाल्लेले नाही, त्यामुळे त्यांचे तब्येत खूपच खराब आहे.

डॉ. अमित यांनी सांगितलं की, एक महिला आणि तिच्या पाच मुलांना प्रभाग क्रमांक 8 मध्ये दाखल केलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्या लोकांनी काहीही खाल्लेले नाही, त्यामुळे त्यांचे तब्येत खूपच खराब आहे.

डॉ. अमित यांनी सांगितलं की, एक महिला आणि तिच्या पाच मुलांना प्रभाग क्रमांक 8 मध्ये दाखल केलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्या लोकांनी काहीही खाल्लेले नाही, त्यामुळे त्यांचे तब्येत खूपच खराब आहे.

  • Published by:  News18 Desk

अलिगड, 16 जून : कोरोनामुळं लॉकडाऊन (Lockdown) लागू झाल्यानं हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लॉकडाउनमध्ये एक कुटुंब चक्क दोन महिन्यांपासून उपाशी राहिल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उपासमार झाल्यामुळं महिला आणि तिच्या 5 मुलांच्या संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकारामुळं अनेकांना धक्का बसला आहे. एक महिला आणि तिची 5 मुलं दोन महिन्यांपासून अन्नासाठी तळमळत होती. या सर्वांची प्रकृती अतिशय खालावली आहे.

संबंधित महिलेच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं असून तिला ज्यावेळी हा प्रकार समजला. तेव्हा तिनं तिच्या पतीसोबत येवून घरातील सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या मोठ्या मुलीच्या सासरची परिस्थितीदेखील फार चांगली नाही. त्यांचीही हालाखीची परिस्थिती आहे. मलखान सिंग जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 8 मध्ये या सर्वांना दाखल केल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्यानं फोनद्वारे एका एनजीओला (NGO) या सर्व प्रकाराची माहिती कळवली. त्यानंतर ही स्वयंसेवी संस्था रुग्णालयातच पोहोचली आणि या लोकांना मदत केली. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे घडला आहे.

सुरुवातीला या कुटुंबाला काहीजणांनी भाकऱ्या, चपाती असे अन्न पदार्थ देवून मदत केली होती. मात्र, अलिकडंचे 10 दिवस त्यांना काहीच खाण्या-पिण्यासाठी मिळालं नसल्यानं त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. आता एक स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीला पुढं आल्यानं त्यांच्यावर रुग्णालया उपचार सुरू आहेत.

संबंधित 40 वर्षीय महिलेचं म्हणणे आहे की, तिच्या पतीचा गेल्या वर्षी लॉकडाउन लागू होण्यापूर्वी काही दिवस मृत्यू झाला होता. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाच्या खाण्या-पिण्याचे हाल सुरू झाले. महिलेच्या कुटुंबात चार मुले आणि एक मुलगी आहे, मुलगी 13 वर्षांची आहे. याशिवाय मोठा मुलगा 20, दुसरा 15, तिसरा 10 आणि सर्वात धाकटा मुलगा 5 वर्षांचा आहे. पतीच्या निधनानंतर या महिलेनं एका कंपनी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, ती कंपनी देखील लॉकडाउनमुळं बंद पडली, त्यानंतर या महिलेनं अनेक ठिकाणी काम मिळवण्याचा प्रयत्न केला पण तिला कुठंच काम मिळालं नाही आणि नंतर त्यांची उपासमार सुरू झाली.

हे वाचा - नरभक्षकानं आईला मारुन मृतदेहाचे हजार तुकडे करत खाल्ले, मिळाली 15 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

मलखानसिंग जिल्हा रुग्णालयाचे आपत्कालीन प्रभारी डॉ. अमित यांनी सांगितलं की, एक महिला आणि तिच्या पाच मुलांना प्रभाग क्रमांक 8 मध्ये दाखल केलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्या लोकांनी काहीही खाल्लेले नाही, त्यामुळे त्यांचे तब्येत खूपच खराब आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती ठीक नाही. तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना लवकरच बरे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

First published:

Tags: Lockdown, Uttar pardesh