Home /News /national /

Hathras gangrape: पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा, बलात्काराचा उल्लेखच नाही!

Hathras gangrape: पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा, बलात्काराचा उल्लेखच नाही!

पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    हाथरस, 1 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital Delhi) उपचार सुरु असतानाच पीडितेची प्राणज्योत मालवली. आता पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेही वाचा.. भाजपला धक्का! महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, या नगरपरिषदेवर मिळवला ताबा सफदरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पॅनलद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, पीडितेचा अनेकदा गळा आवळण्यात आला होता. गळ्याचं हाड मोडल्यामुळे पीडितेचा मृत्यू झाला. अनेकदा गळा आवळल्यामुळे पीडित तरुणीच्या गळ्याचं हाड मोडलं असावं. गळ्यावर अनेक जखमाही आढळल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. धक्कादायक म्हणजे, पीडितेवर बलात्कार झाला होता, असा रिपोर्टमध्ये कुठेही उल्लेख नाही. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे क, गळा आवळल्यामुळे पीडितेचे सर्वाइकल स्पाइन मोडलं होतं आणि हेच तिच्या मृत्यूचं मूळ कारण आहे. या आधी अलीगड येथील जेएन मेडिकल कॉलेजच्या रिपोर्टमध्येही गळ्याचं हाड मोडल्याचा उल्लेख आला होता. पीडितेवर बलात्कार नाही, असंही मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी तीन सदस्यीय एसआयटीची (SIT) स्थापन केली असून असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम योगी यांनी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय संघाची स्थापना केली आहे. डीआयजी चंद्र प्रकाश आणि आयपीएस पूनम यात सदस्य असतील. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या तळाशी जाऊन SITला दिलेल्या वेळेत रिपोर्ट सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. दरम्यान, प्रकरणात चारही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून तुरुंगात पाठविण्यात आले आहे. 7 दिवसात SIT देणार रिपोर्ट एकीकडे विरोधीपक्ष योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सरकार दबावात आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली असून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सात दिवसांत देण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा...आपण नक्की जिंकू...आत्महत्या हा पर्याय नाही, संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन कुटुंबियांना दूर ठेवत जबरदस्ती केले पीडितेवर अंत्यसंस्कार हाथरस प्रकरणात यूपी पोलिसांवर अनेक आरोप केले जात आहे. रात्री उशिरा पीडितेचा मृतदेह तिच्या गावी पोहोचला. मात्र यावेळी पोलिसांनी कुटुंबियांशिवाय जबरदस्तीने पीडितेवर अंतिम संस्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह घरी नेण्याची परवानगीही दिली नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. पीडितेच्या अंत्यसंस्काराचे अनेक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले गेले आहेत, यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी लोकं रस्त्यावर उतरून पीडितेच्या न्यायाची मागणी करत आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या