मराठी बातम्या /बातम्या /देश /

एका रात्रीत 2 भीषण अपघात, घरी जाणाऱ्या 14 लोकांचा जागीच मृत्यू

एका रात्रीत 2 भीषण अपघात, घरी जाणाऱ्या 14 लोकांचा जागीच मृत्यू

लॉकडाऊनमध्ये दोन मोठे भीषण अपघात झाले आहेत. बिहारमध्ये मुझफ्फरपूर आणि दुसरा उत्तर प्रदेश.

लॉकडाऊनमध्ये दोन मोठे भीषण अपघात झाले आहेत. बिहारमध्ये मुझफ्फरपूर आणि दुसरा उत्तर प्रदेश.

लॉकडाऊनमध्ये दोन मोठे भीषण अपघात झाले आहेत. बिहारमध्ये मुझफ्फरपूर आणि दुसरा उत्तर प्रदेश.

  • Published by:  Kranti Kanetkar
गुणा, 14 मे : लॉकडाऊनमध्ये दोन मोठे भीषण अपघात झाले आहेत. बिहारमध्ये मुझफ्फरपूर आणि दुसरा उत्तर प्रदेश. एकीकडे घरी पायी चालत जाणाऱ्या 10 मजुरांना भरधाव बसनं बिहारमध्ये चिरडलं आहे. उत्तर प्रदेशातील गुणा इथे दुसरा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 8 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर जखमी आहेत. गुनाजवळ कंटेनर आणि पॅसेंजर बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये जवळपास 55 प्रवासी मजूर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्वजण उत्तर प्रदेशचे रहिवासी असून महाराष्ट्रातून लॉकडाऊनदरम्यान आपल्या घरी परतत होते अशी माहिती मिळाली आहे. हे वाचा-कोरोना लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातून अंगावर शहारा आणणारी माहिती समोर कंटेनरमध्ये कोंबून भरले होते मजूर मिळालेल्या माहितीनुसार या कंटेनरमध्ये दाटीवाटी करून मजूर बसले होते. 60 हून अधिक मजूर महाराष्ट्रातून आपल्या घरी उत्तर प्रदेशात जात असल्याची माहिती मिळाली आहे. या कंटेनरची समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडीखाली अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून सर्वांना गुना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे वाचा-लवकरच सुरू होणार शताब्दीसह इतर मेल एक्सप्रेस, स्पेशल ट्रेनमध्ये मिळणार ही सुविधा लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात, पायी घरी जाणाऱ्या 10 लोकांना बसनं चिरडलं देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसायांना टाळं लागलं. त्यामुळे रोजगार नसल्यानं मजूर आपल्या गावी परतत आहेत. याच दरम्यान रात्री उशिराच्या सुमारास एक मोठा भीषण अपघात झाला. पायी जाणाऱ्या मजुरांना एका बसनं चिरडल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरनगर-सहारनपूर राज्याच्या महामार्गावर घडली आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास 10 प्रवाशांना या बसनं चिडल्याची माहिती मिळाली. त्यापैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी आहेत. हे वाचा-'कोरोना लॅबमधून पसरला', केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे मोठं वक्तव्य संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Uttar pradesh, Uttar pradesh news

पुढील बातम्या